गणपती बाप्पा महाराष्ट्राला पावला ; शुक्रवारी 8 जिल्ह्यांमधून समोर आली आनंदाची बातमी !
लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन !
जामखेड टाईम्स वृत्तसेवा | Ganeshotsav Special | गणपती बाप्पाचं आज आगमन झालं असून सगळीकडे आनंदाचं वातावरण झालं आहे. कोरोनाचे नियम पाळत साध्या पद्धतीने राज्यभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) साजरा केला जात आहे.
भक्तीपुर्ण वातावरणात शुक्रवारी गणेश भक्तांनी बाप्पाला आपापल्या घरी आणलं. मंगलमय वातावरणात बाप्पा घरोघरी विराजमान झाले आहेत. तर दुसरीकडे गणपती बाप्पा (Ganpati Bappa) महाराष्ट्राला पहिल्याच दिवशी पावला आहे. बाप्पाने महाराष्ट्रासाठी (maharashtra) पहिल्या दिवशी आनंदाची बातमी दिली आहे. (Bappa has given good news for Maharashtra on the first day)
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र राज्यात मध्यंतरी समोर येत असलेल्या आकडेवारीवरून दिसत होतं. मात्र अचानक राज्यातील काही जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने वेग पकडला आहे. यामुळे राज्याच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या कोरोनाच्या रूग्णसंख्येत कमी-अधिक प्रमाणात वाढ होत चालल्याचं दिसत आहे. मात्र शुक्रवारी राज्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली. राज्यातील तब्बल 8 जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रूग्ण सापडला नाही. आगमनाच्या पहिल्याच दिवशी गणपती बाप्पा महाराष्ट्राला पावला आहे असेच आता म्हणावे लागेल.
कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव ( Sarvajanik Ganeshotsav) आणि इतर सणांवर निर्बंध लावले आहेत. तसेच मंदिरेही उघडण्याला अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यातच यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. शासनाने दिलेल्या सर्व नियमांचं पालन करावं आणि कोरोनाचा संसर्ग टाळावा. राज्यातील महत्त्वाची शहरे असलेल्या पुणे आणि मुंबईमध्येही आकडेवारीचं प्रमाण कमी-जास्त होत आहे.
अश्यातच बाप्पाने आपल्या आगमनाच्या दिवशी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी दिली.राज्यातील आठ जिल्ह्यात आज कोरोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही.यामध्ये धुळे, हिंगोली,परभणी, अकोला,यवतमाळ,वाशिम,भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांचा समावेश आहे. बाप्पा महाराष्ट्रासाठी रोज असाच पावत रहावा व कोरोना महाराष्ट्रातून कायमचा हद्दपार व्हावा अशीच प्रार्थना आता गणेशभक्त मनोभावे करताना दिसत आहेत.
घ्या लालबागच्या राज्याचं दर्शन ⤵️
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ.
लालबागचा राजा २०२१ I Lalbaugcha Raja 2021
लालबागचा राजा चे प्रथम दर्शन
Lalbaugcha Raja First Look #lalbaugcharaja pic.twitter.com/C2zZsmZ9JZ— Lalbaugcha Raja (@LalbaugchaRaja) September 10, 2021