मोठी बातमी : सरकारने घेतले 27 मोठे निर्णय, राज्यात 9 सरकारी महाविद्यालये सुरू होणार, असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ, जाणून घ्या मंत्रिमंडळाचे आजचे सर्व निर्णय एका क्लिकवर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत राज्य सरकारने 27 महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत राज्यात ९ शासकीय महाविद्यालये सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात येणार आहेत.
मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आलेले निर्णय खालील प्रमाणे
1) वर्सोवा-वांद्रे सागरी सेतूला ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यांचे नाव
2) ‘एमटीएचएल’ला ‘अटलबिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावा शेवा अटल सेतू’ असे नाव
3) राज्यात ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. २१० कोटी रुपयांस मान्यता
4) भामा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द करणार. तीन तालुक्यांतील शेतकऱ्यांना लाभ
5) महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना एकत्रित राबविणार. २ कोटी कार्ड्स वाटणार, आता मिळणार ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण.
6) संजय गांधी, श्रावणबाळ योजनेतील निवृत्तीवेतनात भरीव वाढ
7) असंघटित कामगारांच्या कल्याणासाठी महामंडळ निर्माण करण्याचा निर्णय. करोडो कामगारांना लाभ मिळणार
8) नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा; विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश
9) मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे भव्य स्मारक छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे उभारणार. १०० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
10) पूर प्रतिबंधासाठी राज्यातील १६४८ किमीच्या नद्यांमधील गाळ काढणार
11) मुंबई मेट्रो-३ मार्गासाठी धारावीचा भूखंड. भूखंडाच्या हस्तांतरणातील अनर्जित रकमेसाठी सुधारित धोरण
12) मुखेड, उमरखेड, चिखलदरा, महाड, हरसूल,वरूड, फलटण येथे न्यायालये स्थापणार
13) राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये अद्ययावत उत्कृष्टता केंद्र सुरू करणार
14) सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या क्लस्टरला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांसाठी ‘सिडबी’शी करार
15) बीडीडी चाळ पुनर्विकासातील झोपडीधारक, स्टॉलधारकांची पात्रता निश्चित
16) जालना ते जळगाव नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गासाठी ३५५२ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
17) राज्यात ९ ठिकाणी नवीन शासकीय महाविद्यालये. ४३६५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता
18) बुलढाणा येथे शासकीय कृषि महाविद्यालय सुरू करणार
19) दीनदयाळ अंत्योदय योजना आता १४३ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राबविणार
20) दारिद्र्य रेषेवरील पालकांच्या मुलांना देखील मोफत गणवेश देणार. १२ लाख विद्यार्थ्यांना लाभ
21) देवळा, वैजापूर तालुक्यातील बंधाऱ्यांना मान्यता
22) चांदुर बाजार तालुक्यात लिंबूवर्गीय फळांसाठी सिट्रस इस्टेट
23) सर जे. जे. कला आणि वास्तुशास्त्र महाविद्यालय आता अभिमत विद्यापीठ
24) गंगापूर उपसा सिंचन योजनेस मान्यता
25) ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ
26) पाकिस्तानने पकडलेल्या मच्छिमारांच्या कुटुंबीयांना उदरनिर्वाहासाठी मदत करणार
27) पर्यटन उपविभागासाठी उप सचिव दर्जाचे पद मंजूर