राज्यातील अहमदनगर सह ११ जिल्ह्यातील निर्बंध कडक होणार

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज टास्क फोर्सची बैठक पार पडली. याबैठकीत २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तर ११ जिल्ह्यातील परिस्थिती बिघडत असल्याने निर्बंध कायम ठेवले जाणार आहेत याबाबत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाऊनच्या शिथिलीकरणाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

टास्क फोर्स व आरोग्य विभागाच्या बैठकीत खालील शिफारसी करण्याचा निर्णय झाला आहे

1) दुकानं, हॉटेल्स, मंदिरे, जीम्स सुरु करण्याबाबत सकारात्मक चर्चा
2) दुकाने शनिवारी सुद्धा चार वाजेपर्यंत चालू राहतील, रविवारी फक्त बंद राहिल
3) शॉप्स, हॉटेल्स, सिनेमा ५० टक्के क्षमतेने सुरु, याठिकाणी दोन डोस पूर्ण झालेले कर्मचारी हवेत
4) लग्न समारंभाबाबतच्या निर्णयातही थोडीफार शिथिलता येईल.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने चर्चा करुन काही बाबींची शिफारस मुख्यमंत्र्यांना केली आहे. त्यासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या दोन-तीन दिवसांत घेतील.पॉझीटीव्हीटी रेट कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये नियमांत शिथिलता आणली जाणार आहे. यानुसार, २५ जिल्ह्यांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला आहे.

खालील ११ जिल्ह्यांमध्ये परिस्थिती चिंताजनक चिंताजनक

पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधूदूर्ग, रत्नागिरी, पालघर, बीड, अहमदनगर या जिल्ह्यात शिथिलता आणली जाणार नाही. या ठिकाणचे निर्बंध शिथिल होणार नाहीत. परिस्थितीनुसार, स्थानिक प्रशासनाच्या सहकाऱ्याच्या मदतीतून आणखी कडक होतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.