Mukhyamantri Yojana doot Bharati 2024 : महाराष्ट्रातील ५० हजार तरूण होणार ‘योजनादूत’, ‘मुख्यमंत्री योजनादूत’ भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची ही आहे शेवटची तारीख !

Mukhyamantri Yojana doot Bharati 2024 : महायुती सरकारने राज्यातील वेगवेगळ्या घटकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय योजना सुरु करण्याचा धडाका लावला आहे. लाडकी बहिण योजनेला (Ladaki Bahin Yojana) मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत www.mahayojanadoot.org हा उपक्रम सरकारने हाती घेतला आहे. (Mukhyamantri Yojanadoot)

50 thousand youth of Maharashtra will be Yojana Doot, this is the last date to apply online for Chief Minister Yojana Doot Recruitment,

महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबविण्यात येत आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिले जाणार आहे. हे योजनादूत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांबाबत नागरिकांना माहिती देतील. (Mukhyamantri Yojana doot Bharati 2024)

मुख्यमंत्री योजनादूत या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १३ सप्टेंबर २०२४ आहे. (Mukhyamantri Yojana doot Bharati 2024 last date)

मुख्यमंत्री योजनादूत होण्यासाठी काय आहे पात्रता ? (Mukhyamantri Yojana doot Bharati 2024)

  • इच्छुक उमेदवार १८ ते ३५ वयोगटातील असावा,
  • उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे,
  • उमेदवाराकडे महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारास संगणक ज्ञान असावे.
  • उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल (स्मार्ट फोन) आणि आधारसंलग्न बँक खाते असणे आवश्यक आहे.

मुख्यमंत्री योजनादूत होण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक ?

  • मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज,
  • आधार कार्ड,
  • पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ.
  • अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला) उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा,
  • पासपोर्ट आकाराचा फोटो,
  • हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे.

१३ सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. (Mukhyamantri Yojana doot Bharati 2024)

मुख्यमंत्री योजनादूत होण्याचे फायदे

  • प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
  • दलाचा भाग होण्याची संधी
  • सामाजिक बदलाचा भाग बनण्याची संधी.
  • विद्यावेतनातून युवकांना अर्थसहाय्य
  • शिकण्यासोबत कौशल्य विकास.
  • सरकारी कामाचा अनुभव.

मुख्यमंत्री योजनादूतसाठी अर्ज करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी खालील pdf फाईल डाऊनलोड करा