8th World Youth Skills Day 2022 | कौशल्य हीच आजच्या तरुणाईची ताकद – निशांत सूर्यवंशी, अहमदनगरला 8वा जागतिक युवा कौशल्य दिन उत्साहात साजरा
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : World Youth Skills Day 2022 | अहमदनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अहमदनगर व महाराष्ट्र तांत्रिक शिक्षण मंडळ (MTSM) अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने 8 वा जागतिक युवा कौशल्य दिन दि. 15 जुलै 2022 रोजी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.(Skill is the strength of today’s youth – Nishant suryvanshi )
कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी रविकुमार पंतम यांनी प्रास्ताविकात जागतिक युवा कौशल्य दिनाचे महत्व विशद करताना मानवी जीवनाच्या प्रत्येक वळणावर कौशल्य गरजेचे असून विकसीत देशाच्या अर्थव्यवस्थेतील कौशल्याधारीत मनुष्यबळाचे महत्वाचे स्थान विशद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी हे होते, तर कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अंकुश दराडे उपस्थित होते. 8th World Youth Skills Day 2022, Skill is the strength of today’s youth – Nishant suryvanshi, Ahmednagar latest news, World Youth Skills Day)
कार्यक्रमात मेडिकल सेल्स रिप्रेझेटेटीव्ह या कोर्सचे कौशल्य प्रशिक्षण पुर्ण केलेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. तसेच मंडळाच्या महाराष्ट्र पब्लिक स्कूल मध्ये 12वीच्या प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अंकुश दराडे यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाची संकल्पना स्पष्ट करुन तांत्रिक व्यावसायिक शिक्षण प्रशिक्षणाचे महत्त्व आणि स्थानिक आणि जागतिक अर्थव्यवस्थेशी संबंधित व इतर कौशल्य विकास प्रशिक्षणाची व संस्थेमध्ये नव्याने सुरु केलेल्या व्यवसाय पदवी अभ्यासक्रमाबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भारतातील स्किल इंडिया मिशन देखील या दिवशी सुरू करण्यात आलेले असून याअंतर्गत विविध केंद्र व राज्यपुरस्कृत योजनांमधून कौशल्य विकास प्रशिक्षण राबविले जाते असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त निशांत सूर्यवंशी यांनी श्रम व श्रमिक यांना जे मुल्य किंवा महत्व आवश्यक आहे ते मिळत नाही, ते त्यांना मिळाले पाहिजे. तसेच पारंपारिक शिक्षणापेक्षा कौशल्यावर आधारित शिक्षण व प्रशिक्षण घेण्यासाठी युवकांची मानसिकता बदलली पाहिजे, स्वतःमध्ये असलेले कौशल्य (Skills) सातत्याने वाढवणे त्यात वेळेनुसार बदल करणे ही काळाची गरज आहे.
कौशल्य हीच आजच्या तरुणाईची ताकद आहे. आजच्या तरुणात वेळेनुसार बदलते कौशल्य आत्मसात करण्याची कला आहे. आपल्यातील अनेक युवक नवनवी कौशल्य शिकत असून त्यांना जागतीक स्तरावरुन रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन धनश्री पहेरे यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी कौशल्य विकास केंद्राचे हिंमत टाकळकर, प्रणव दराडे, तसेच जिल्हयातील इतर कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. (8th World Youth Skills Day 2022, Skill is the strength of today’s youth – Nishant suryvanshi, Ahmednagar latest news, World Youth Skills Day)