Aashadhi wari 2023 : जगदगुरू तुकाराम महाराजांची पालखी निघाली पांडुरंगाच्या भेटीस, आषाढी वारीस देहूनगरीतून सुरुवात, विठुरायाच्या भेटीला दिंडी निघाली पंढरीला !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । महाराष्ट्रातील लाखो वारकऱ्यांचे श्रध्दास्थान असलेल्या देहूनगरीतून संत श्रेष्ठ जगदगुरू तुकाराम महाराजांची पालखी (Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023) पांडुरंगाच्या भेटीसाठी शनिवारी पंढरीच्या दिशेनं रवाना झाली. अन् देहूनगरीतून (Dehu) आषाढी वारी 2023 (Aashadhi wari 2023) सोहळ्यास मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रारंभ झाला.लाखो वैष्णवांच्या साक्षीने संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी प्रस्थान सोहळ्यास देहूनगरीतून शनिवारी सुरुवात झाली. शनिवारी दुपारी 2 वाजता पालखी प्रस्थान सोहळा सुरु झाला होता. त्यांतर साडेतीन वाजता पालखीचे देहूनगरीतून प्रस्थान झाले.तत्पूर्वी संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे यांच्या हस्ते पहाटे महापुजा करण्यात आली.
आषाढी वारी 2023 साठी राज्यभरातून लाखो वारकरी श्री क्षेत्र देहू नगरीत दाखल झाले होते. या वारकऱ्यांच्या साक्षीने पालखी सोहळा सुरू झाला. विठूरायाचे नामस्मरण करत, भजन गात, डोक्यावर तुळस घेत टाळ मृदुंगाच्या साक्षीने भक्तिरसात भीजलेले वारकरी वारीत सहभागी झाले. पालखी प्रस्थान सोहळ्यात सहभागी वारकऱ्यांचा उत्साह शिगेला पोहचलेल्या आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखीत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून ही पालखी सोहळा मार्गस्थ झाला. तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. पालखीचा 19 दिवसांचा प्रवास असणार आहे. 28 जून 2023 ला पालखी पंढरपुरात दाखल होईल.
आषाढी वारी 2023 : संत तुकाराम महाराज पालखी सोहळा वेळापत्रक
10 जून 2023 : देहूनगरीतून संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
मुक्काम : इनामदारवाडा
11 जून 2023 : आकुर्डी विठ्ठल मंदिर
12 जून 2023 : नाना पेठ पुणे श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर
13 जून 2023 : नाना पेठ पुणे श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर
14 जून 2023 : लोणी काळभोर
15 जून 2023 : यवत
16 जून 2023 : वरवंड
17 जून 2023 : उंडवडी गवळ्याची
18 जून 2023 : बारामती
19 जून 2023 : सणसर
20 जून 2023 : आंथुर्णे – पहिले गोल रिंगण व मुक्काम
21 जून 2023 : निमगाव केतकी
22 जून 2023 : इंदापुर – दुसरे गोल रिंगण व मुक्काम
23 जून 2023 : सराटी
24 जून 2023 : निरा स्नान – तिसरे गोल रिंगण व अकलूज मुक्काम
25 जून 2023 : माळीनगर – पहिले उभे रिंगण व बोरगाव येथे मुक्काम
26 जून 2023 : सकाळी धावा – मुक्काम पिराची कुरोळी
27 जून 2023 : बाजीराव विहीर येथे उभे रिंगण व वाखरी येथे मुक्काम
28 जून 2022 : पालखी पंढरपुरात दाखल – दुपारी उभे रिंगण – पंढरपुर तुकाराम महाराज मंदिर येथे पालखी सोहळा
29 जून 2023 : तुकाराम महाराज संस्थान पंढरपुर येथे पालखी मुक्काम
29 जून ते 3 जुलै – संत तुकाराम महाराज संस्थान नवीन इमारत, प्रदक्षिणा मार्ग येथे पालखी मुक्काम… त्यानंतर परतीचा प्रवास
13 जुलै रोजी पालखी देहूत दाखल होणार