कर्जत, जामखेड तालुक्यातील जलसंधारण कामाला गती द्या – सभापती प्रा. राम शिंदे

मुंबई, १७ फेब्रुवारी, २०२५ :  कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यात सुरू असणारे जलसंधारणाची कामे येत्या मार्च अखेर पूर्ण करून कामाला गती द्यावी, असे निर्देश यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Accelerate water conservation work in Karjat Jamkhed talukas - Ram Shinde Sabhapati

विधानभवनात अहिल्यानगर येथील कर्जत व जामखेड तालुक्यातील जलसंधारण मंजूर व पूर्ण झालेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे बोलत होते. यावेळी मृद व जलसंधारण विभाग नाशिकचे प्रादेशिक जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, पुण्याचे मुख्य अभियंता एस.पी.कुशिरे, जामखेडचे उप विभागीय जलसंधारण अधिकारी पी. एन. शिंदे, पारनेरचे जलसंधारण अधिकारी वाय. ए. अबिलवादे उपस्थित होते.

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे म्हणाले, जामखेड तालुक्यातील जवळा-बारव येथील साठवण तलाव योजनेची निविदा प्रक्रिया २८ फेब्रुवारी अखेर पूर्ण करावी. कर्जत तालुक्यातील  येथील कामाचाही आढावा घेतला. तसेच यावेळी जलसंधारण मंडळ, जलयुक्त शिवार अभियान 2.0, अटल भूजल योजना, मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना, धरण व गाळमुक्त शिवार योजना आदी बाबींचा आढावा घेतला.