जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात मागील 39 दिवसांपासून सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज राजभवनात पार पडला. भाजपकडून 9 तर शिंदे गटाकडून 9 अश्या 18 मंत्र्यांनी आज पद आणि गोपनियतेच शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला. सायंकाळी मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर करण्यात आले.
क्रांतीदिनाच्या मुहूर्तावर राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी पडला. नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्री असणार आहेत. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात संदीपान भुमरे, उदय सामंत, दिपक केसरकर, तानाजी सावंत,अब्दुल सत्तार, दादा भूसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय राठोड, गिरीष महाजन चंद्रकात पाटील, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार,अतुल सावे,राधाकृष्ण विखे-पाटील या 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
आज सकाळी 18 मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतर सायंकाळी उशिरा खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे, याबाबतचे वृत्त tv9 ने दिले आहे.
1) एकनाथ शिंदे – मुख्यमंत्री, नगरविकास
2) देवेंद्र फडणवीस – उपमुख्यमंत्री, गृह, अर्थ
3) राधाकृष्ण विखे पाटील – महसूल
4) चंद्रकांत पाटील – सार्वजनिक बांधकाम
5) सुधीर मुनगंटीवार – ऊर्जा, वन
6) मंगलप्रभात लोढा – विधी व न्याय
7) रविंद्र चव्हाण – गृहनिर्माण
8) उदय सामंत – उद्योग
9) दीपक केसरकर – पर्यावरण, पर्यटन
10) सुरेश खाडे – सामाजिक न्याय
11) दादा भुसे – कृषी
12) गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
13) गिरीश महाजन – जलसंपदा
14) विजयकुमार गावित – आदिवासी विकास
15) अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास
16) अतुल सावे – आरोग्य
17) तानाजी सावंत – उच्च व तंत्रशिक्षण
18) संजय राठोड – ग्रामविकास
19) शंभुराज देसाई – उत्पादन शुल्क
20) संदीपान भुमरे – रोजगार हमी