Bopdev Ghat News: बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींसमोर आता दोनच पर्याय : शरणागती अन्यथा इन्काउंटर, पुणे पोलिसांनी उचलले मोठे पाऊल

पुणे : ८ ऑगस्ट २०२४ । पुण्यातील बोपदेव घाट परिसरात मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरूणीवर तिघा जणांच्या टोळक्याने सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला. ही घटना घडून पाच दिवस उलटले आहेत. आरोपींच्या शोधासाठी ६० पोलिस पथके कार्यरत आहेत. त्याचबरोबर सिंबा या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा देखील वापर केला जात आहे. नराधमांचा शोध घेण्यात पुणे पोलिसांना आजूनही यश आलेले नाही. परंतू आता पुणे पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी मोठे पाऊल उचलले आहे.

accused in Bopdev Ghat gangrape case now have only two options Sharan or encounter, big step taken by the Pune police, bopdev ghat rape case latest update today,

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींचा शोध लागत नसल्याने पुणे पोलिसांनी सरेंडर व्हा अन्यथा इन्काऊंटरला सामोरे जा, असा निर्वाणीचा इशारा आरोपींना दिला असल्याची माहिती पुणे पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.याबाबतची तयारी पोलिसांकडून करण्यात आली आहे.पोलिसांनी खबर्‍यांचे जाळे सक्रिय करत आरोपींची गुप्त माहिती वेगाने काढली जात आहे.

बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखा, वानवडी, कोंढवा, हडपसर, लोणी काळभोर पोलिसांचे ६० पथके आरोपींच्या मागावर आहेत. पाच दिवसांपासून पुणे पोलिसांचा वेगाने तपास सुरू आहे. अजूनही आरोपी गजाआड झालेले नाहीत.बोपदेव घाट बलात्कार प्रकरणातील आरोपींना अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी मोठे पाऊल उचलले आहे. शरणागती पत्करा अन्यथा इन्काउंटरला सामोरे जा असा इशाराच पोलिसांनी दिल्याची माहिती समोर.येत आहे.आरोपी जिथे सापडतील तिथे सोडू नका, असे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाला दिल्याची माहिती आहे.

पोलिसांकडून आरोपीच्या शोधासाठी घटनास्थळापासून जवळ असलेली गावे तपासली जात आहेत, त्याबरोबर सीसीटीव्ही तपासले जात आहेत.आरोपींची माहिती देणाऱ्यास १० लाखांचे बक्षीस पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. परंतू अजूनही आरोपींचा ठावठिकाणा सापडलेला नाही.

आरोपी पुण्याबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. सर्व मार्ग, रेल्वे, बसेसवर पोलिस लक्ष ठेवून आहेत. साध्या वेशातील पोलिसांकडून हाॅटेल्स व धार्मिक स्थळांची निगराणी केली जात आहे. त्याचबरोबर दारूची दुकाने व वेश्या व्यवसाय चालणाऱ्या भागातही पोलिसांनी फिल्डिंग लावलेली आहे, अशी माहिती समोर येत आहे.

पोलिसांनी अत्तापर्यंत २५० जणांची चौकशी केली आहे. त्याचबरोबर ३ हजारपेक्षा अधिक मोबाईलचा डेटा तपासला आहे. परंतू अजूनही पोलिसांच्या हाती महत्वाचे धागेदोरे लागलेले नाहीत. त्यामुळे आता पोलिसांनी शरण या अन्यथा इन्काउंटरला सामोरे जा असा थेट इशारा दिला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय घडते याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.  याबाबतचे वृत्त हिंदुस्तान टाइम्स मराठीने दिले आहे.