(Actor Dilip Kumar passed away today) :अखेर मुघल ए आझम काळाच्या पडद्याआड; बाॅलीवुडवर पसरली शोककळा

मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला

मुंबई । भारतीय चित्रपट सृष्टीत ट्रॅजिडी किंग म्हणून ओळखले जाणारे प्रख्यात अभिनेते दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे आज निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात (Hinduja Hospital) उपचार घेत असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एक महान अभिनेता आपल्यातून गेल्याची भावना जगभरातून व्यक्त केली जात आहे. (Actor Dilip Kumar passed away today.)

दिलीप कुमार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा त्यांना त्रास सुरू झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचरादरम्यान त्यांच्या निधनाच्या अनेक वेळा अफवा पसरल्या होत्या.(Actor Dilip Kumar passed away today.)

परंतु प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी सायरा बानो यांनी निधनाचे वृत्त फेटाळले होते. दिलीप कुमार यांची प्रकृती अगदी व्यवस्थित असल्याचे सायराबानो वेळोवेळी सांगत होत्या. परंतु आजची सकाळ दिलीप कुमार यांच्या जगभरातील चाहत्यांसाठी वाईट उगवली. हिंदी चित्रपटसृष्टीचा मुघल ए आझम आज काळाच्या पडद्याआड गेला.(Actor Dilip Kumar passed away today.)

Actor Dilip Kumar passed away today.
Actor Dilip Kumar family

दिलीपकुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 साली पाकिस्तानमधल्या पेशावरमध्ये झाला होता. त्यांचे मुळ नाव मोहम्मद युसूफ खान असे होते. परंतु ते जगभर दिलीपकुमार नावानेच ओळखले गेले. बॉम्बे टॉकिजने 1944 साली निर्माण केलेल्या ज्वार भट्टा सिनेमातून दिलीपकुमार यांनी हिंदी सिनेमात पदार्पण केले.(Actor Dilip Kumar passed away today.)

हिंदी चित्रपटसृष्टीत दिलीप कुमार यांना The First Khan म्हणून ओळखलं जात होतं. हिंदी सिनेसृष्टीतील मेथड अॅक्टिंगचं क्रेडिट दिलीप कुमार यांनाच देण्यात येतं. तसेच त्यांना ट्रॅजिडी किंग म्हणूनही ओळखलं जातं. आपल्या कारकिर्दीत दिलीप कुमार यांनी अनेक सिनेमे केले.(Actor Dilip Kumar passed away today.)

अंदाज, आण, दाग, देवदास, आझाद, मुघल ए आझम, गंगा जमूना, राम और शाम, क्रांती, शक्ती, मशाल, कर्मा, सौदागर असे काही सुपरहिट सिनेमे दिलीपकुमार यांच्या नावावर आहेत.दिलीप कुमार यांचं पूर्ण नाव मोहम्मद युसूफ खान (Mohammed Yusuf Khan) होतं. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 रोजी झाला होता. 1944 साली प्रदर्शित करण्यात आलेला ज्वारभाटा हा दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट तर 1998 साली प्रदर्शित झालेला किला हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला.