खातेवाटपानंतर आता मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणता बंगला मिळालाय ? जाणून घ्या सविस्तर
जामखेड टाइम्स वृत्तसेवा । दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेत आलेल्या भाजप प्रणित शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा 9 ऑगस्ट च्या मुहूर्तावर पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यानंतर मंत्र्यांना खातेवाटप जाहीर करण्यात आले. खातेवाटपावरुन नाराजी नाट्य रंगल्याचे दिसले. पण त्यातच सध्या पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने यावर पडदा पडला आहे. अधिवेशनात सत्ताधारी विरूध्द विरोधक हा सामना जोरदार रंगलेला दिसत आहे. अश्यातच मंत्र्यांच्या बंगला वाटपावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
मंगळवारी राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांसाठी बंगल्यांचे वाटप जाहीर करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ऐकमेव मंत्री असलेले भाजपाचे जेष्ठ मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलांना राॅयल स्टोन बंगला देण्यात आला आहे. तर कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांना पन्हाळगड हा बंगला देण्यात आला आहे.
तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा देवगिरी हा बंगला कायम ठेवण्यात आला आहे. पवार हे गेल्या 16 वर्षांपासून याच बंगल्यात वास्तव्यास आहेत. देवगिरी बंगला आपल्याकडे कायम रहावा यासाठी अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दोनदा पत्र लिहले होते. शिंदे-फडणवीस सरकारने मनाचा मोठेपणा दाखवत पवारांकडे देवगिरी हा बंगला कायम ठेवला. वर्षा बंगल्याशेजारी हा बंगला आहे.
राज्य सरकारमधील 16 मंत्र्यांना आज बंगल्यांचे वाटप खालीलप्रमाणे करण्यात आले आहे.
- राधाकृष्ण विखे-पाटील – राॅयल स्टोन
- सुधीर मुनगंटीवार – पर्णकुटी
- चंद्रकांत पाटील – सिंहगड B1
- विजय गावित – चित्रकुट
- गिरीश महाजन – सेवासदन
- गुलाबराव पाटील – जेतवन
- संजय राठोड – शिवनेरी
- सुरेश खाडे – ज्ञानेश्वरी
- संदीपान भूमरे – रत्नसिंधू (ब)
- उदय सामंत – मुक्तागिरी
- रविंद्र चव्हाण – रायगड (अ -6)
- अब्दूल सत्तार – पन्हाळगड (ब -7)
- दिपक केसरकर – रामटेक
- अतुल सावे – शिवगड (अ -3)
- शंभूराज देसाई – पावनगड (ब-4)
- मंगलप्रभात लोढा – विजयदुर्ग (ब-5)