Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांनी पकडला 45 लाख रूपये किमतीचा 500 किलो गांजा !

हायलाईट्स:
500 किलो गांजा जप्त
50 लाखांचा मुद्देमाल जप्त
राहाता पोलिसांची धडक कारवाई

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Rahata ganja smuggling case : अहमदनगर जिल्ह्यातून गांजा तस्करीची एक मोठी बातमी समोर आली आहे. राहाता पोलिसांनी तब्बल 45 लाख रूपये किमतीचा 500 किलो गांजा पकडण्याची कारवाई केली आहे. ही कारवाई शनी रोडवर करण्यात आली. या प्रकरणी गांजाची वाहतुक करणाऱ्या टेम्पोचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहाता शहरात एकाच वेळी 500 किलो गांजा पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Ahmednagar News, Police in Ahmednagar district seized 500 kg ganja worth Rs 45 lakh. rahata news, Rahata ganja smuggling case,

याबाबत सविस्तर असे की, राहता पोलिस गस्त घालत असताना पोलिसांना विना नंबरचा टेम्पो शनि रोडवर आढळून आला. पोलिसांना पाहताच टेम्पोचालकाच्या संशयास्पद हालचाली वाढली. सदर टेम्पोचा संशय येताच पोलिसांनी टेम्पो थांबवला. टेम्पोतील दोन लोकांकडे चौकशी केली असता त्यांनी पोलिसांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही. टेम्पोत काहीतरी संशयास्पद आहे का? याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी सदरचा टेम्पो ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणला.

यावेळी पोलिसांनी मालवाहतूक टेम्पोची झडती घेतली असता गांजा भरलेल्या सात ते आठ गोण्या आढळून आले. या गांजाचे अंदाजे वजन 400 ते 500 किलो इतके आहे. या गांजाची बाजारातील किंमत अंदाजे 45 लाख रूपये असल्याचे समजते. पोलिसांनी या कारवाईत दोन मोबाईल, गांजा व टेम्पो असा 50 लाख 27 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांनी दिली.

गाडीतील राहुल विनायक आरणे (वय ३२ वर्षे रा. आण्णाभाऊ साठेनगर), सचिन रामदास पवार (वय ३७ वर्षे, रा खंडोबा चौक, ता राहाता) या दोघांना अटक करण्यात आली तर प्रदीप सरोदे, अमोल (दोघांचेही पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) हे दोघे फरार झाले आहेत.याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्याचे कर्मचारी गणेश कारभारी गडाख यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपीविरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६६/२०२४ नुसार गंगोकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८ (क), २० (व), क, २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राहाता शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा कुठून आला ? या गांजा तस्करीत राहाता शहरातील कोणाचा समावेश आहे का ? गांजा तस्करीचा मुख्य सूत्रधार कोण ? याचा शोध पोलिसांकडून घेतला जाणार का? याकडे राहाता तालुक्याचे लक्ष लागले आहे. राहाता गांजा प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सोपानराव काकड हे करत आहेत. या कारवाईच्या पथकात पोलिस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी, पोलिस नाईक गडाख सह आदी कर्मचारी यांचा समावेश होता.

shital collection jamkhed