Amravati Accident : कारच्या भीषण अपघातात तीन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी, अमरावती जिल्ह्यातील घटना !
Amravati Accident today : अमरावती जिल्ह्यातून भीषण अपघाताची एक बातमी समोर आली आहे. या घटनेत तिघांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.अकोल्याहून अमरावतीला निघालेल्या कारचे टायर फुटल्याने हा भीषण अपघात झाला आहे.ही घटना भातकुली गावाजवळ (Bhatkuli Accident) घडली.स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी अमरावतीत दाखल करण्यात आले आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लीम कुटूंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Amravati Car Accident news Today)
सोमवारी सायंकाळी अकोल्याहून अमरावतीकडे निघालेल्या एका कारचा भातकुली गावाजवळ (Amravati Bhatkuli Accident) भीषण अपघात झाला.भरधाव कारचे टायर फुटण्याची घटना घडली. (Amravati car accident) भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कलीम खान सलिम खान (वय 36), सलिम खान मेहमुद खान (वय 65), रुबिना परवीन कलीम खान (वय 32) या तिघांचा समावेश आहे. मृतांमध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. (Amravati Accident yesterday)
या भीषण अपघातात रिजवान, नदिम, जारा परवीन ही तीन मुले तसेच मोहम्मद शकील हे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी तातडीने अपघातग्रस्तांची मदत केली. त्यांना उपचारासाठी अमरावतीच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.जखमी मुलांच्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (Amravati Accident latest news today)