Dr Rameshwar Naik : मंगेश चिवटे यांच्याजागी डाॅ रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात महायुतीची एकहाती सत्ता स्थापन झाली आहे. राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis cm) विराजमान झाले आहेत.सरकार स्थापनेच्या पहिल्याच आठवड्यात मंत्रालयातून एक मोठी घडामोड समोर आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध विभागात आपल्या मर्जीतील अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्याचा धडाका लावला आहे. त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागात खांदेपालट करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. (Chief Minister medical Relief Fund Department maharashtra)

Appointment of Dr. Rameshwar Naik as Head of Chief Minister medical Relief Fund Department, Mangesh Chivate news,

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde dcm) यांचे विश्वासू मंगेश चिवटे (Mangesh Chivate) यांच्याकडून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. मंगेश चिवटे यांच्या जागी डाॅ रामेश्वर नाईक (Dr Rameshwar Naik) यांची नियुक्ती या विभागाच्या प्रमुख पदावर करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे एकनाथ शिंदे यांना मोठा झटका बसला आहे.

डॉ. रामेश्वर नाईक यांची मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव श्रीकर परदेशी यांच्याकडून रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे.त्यामुळे आता त्यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक गरजू रुग्णांवर मोफत उपचाराची सोय केली होती. यामध्ये मंगेश चिवटे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमांतून गरजू रुग्णांना तातडीने मदत पोहचवण्यात चिवटे व त्यांच्या टीमने मोलाची कामगिरी केली होती. परंतू नव्या सरकारमध्ये मंगेश चिवटे यांच्याकडील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुखपद काढून घेण्यात आले आहे. मंगेश चिवटे यांच्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू डाॅ रामेश्वर नाईक यांच्याकडे या विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा कक्ष म्हणजे रुग्णसेवा कक्षाकडे पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या कक्षाला महत्त्व आले होते. गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री साहायता निधीच्या माध्यमातून रुग्णसेवा कक्षाचे काम प्रभावीपणे केले होते.देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये ओमप्रकाश शेट्ये यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी होती.

तर रामेश्वर नाईक यांच्याकडे गेल्या टर्ममध्ये उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची जबाबदारी होती. महायुती सरकारमध्ये रामेश्वर नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. हा विभाग सर्वसामान्य गोरगरिब जनतेसाठी आधारवड ठरावा याकरिता डाॅ नाईक यांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.