Ashti Nagar Panchayat results | आष्टीत राष्ट्रवादीचा धुव्वा, भाजपचा जलवा कायम, नगरपंचायत पुन्हा भाजपच्या ताब्यात
आष्टीत राष्ट्रवादीचा धुव्वा, भाजपचा जलवा कायम, नगरपंचायत पुन्हा भाजपच्या ताब्यात
जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Ashti Nagar Panchayat results |आष्टी नगर पंचायतवर पुन्हा एकदा भाजपने वर्चस्व राखले. आमदार बाळासाहेब आजबे यांना नगरपंचायतवर कब्जा मिळवण्यात अपयश आले. नगरपंचायत निकालाने भाजपने आपला जलवा कायम असल्याचे पुन्हा एकदा सिध्द केले. या निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडाला. (Ashti Nagar Panchayat results, NCP’s wash in Ashti, BJP’s Jalwa remains, Nagar Panchayat again under BJP’s control)
आष्टी नगर पंचायतीच्या सतरा जागांचे निकाल आज हाती आले. नगरपंचायत आमदार सुरेश धस गटाची सत्ता होती. धस यांच्या ताब्यातून नगर पंचायत हिसकावून घेण्यासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी मोठी व्यूहरचना आखली होती. या निवडणुकीत धस -धोंडे -आजबे या तीनही नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या.
आष्टी नगरपंचायतवर अपेक्षेप्रमाणे भाजपने राष्ट्रवादीला धोबीपछाड देत नगरपंचायतवर आपले वर्चस्व अबाधित ठेवले. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 10 जागा जिंकल्या तर राष्ट्रवादीला अवघ्या 2 जागेवर विजय मिळवता आला. येथील निवडणुकीत चार अपक्षांनी मारलेली बाजी लक्षवेधी ठरली आहे. काँग्रेसला अवघी एक जागा जिंकता आली.
- Maharashtra Women Minister Portfolio : महायुती सरकार मधील महिला मंत्र्यांकडे कोणत्या मंत्रालयाची जबाबदारी ? जाणून घ्या सविस्तर
- Krushi Mantri Maharashtra 2024 : माणिकराव कोकाटे बनले महाराष्ट्राचे नवे कृषिमंत्री !
- Big News : महायुती सरकारकडून प्रशासनात मोठी खांदेपालट, महाराष्ट्रातील २३ बड्या सनदी अधिकार्यांच्या बदल्या !
- Maharashtra Cabinet portfolio Allocation 2024 : पहिल्यांदाच मंत्री झालेल्या नेत्यांना वजनदार खात्यांची लाॅटरी, तर दिग्गज नेत्यांना मोठा झटका
- Maharashtra Cabinet Portfolio : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याकडे कोणते खाते? वाचा संपूर्ण यादी
आष्टी नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमांतून भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. हा निकाल आमदार बाळासाहेब आजबे यांच्यासाठी धक्कादायक आहे.
विजयी उमेदवार यादी अपडेट होत आहे….