मुंबई : ५ ऑक्टोबर २०२४ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातील १११ पोलिस निरीक्षकांचे आदेश जारी केले आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सरकारकडून पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यां करण्यात आल्या आहेत. विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना यांनी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ जाहीर होण्यास आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. निवडणूकीच्या तयारीचा निवडणूक आयोगाकडून वेगाने आढावा घेतला जात आहे. मागील आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकाने महाराष्ट्र दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी राजकीय पक्ष आणि प्रशासनाच्या विविध विभागांशी बैठका घेतल्या होता. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत आयोगाने राज्य सरकारला काही महत्वाचे निर्देश दिले होते.
त्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा विषय होता. तीन वर्षापेक्षा जास्त एकाच ठिकाणी काम करणारे अधिकारी, तसेच गृहजिल्ह्यात नियुक्तीस असलेले अधिकारी यांच्या दोन दिवसांत बदल्या करून त्याबाबतचे प्रमाणपत्र निवडणूक आयोगाला सादर करा, अश्या सुचना निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्या होत्या.त्या सूचनेची सरकार अंमलबजावणी केली. त्यानुसार राज्यातील १११ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. यातील ११ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या मुंबईत करण्यात आल्या आहेत.
मुंबईतील वरिष्ठ पोलिस निरीक्षक व पोलिस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई बाहेर करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या १११ पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सर्वाधिक बदल्या ठाणे जिल्ह्यात करण्यात आल्या आहेत. गृहविभागाने या बदल्यांचे आदेश शुक्रवारी ४ रोजी जारी केले आहेत.