Avinash Dhanave news : अविनाश धनवे हत्याकांड प्रकरणात समोर आली मोठी घडामोड, इंदापूर पोलिसांनी केली चौघा आरोपींना अटक, अविनाश धनवे खूनप्रकरणी 10 जणांविरोधात गुन्हे दाखल
Avinash Dhanave news today | 18 मार्च 2024 : पुण्याच्या आळंदी भागातील कोयता गँगचा मोरक्या अविनाश धनवे याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेने राज्यात खळबळ उडवून दिली आहे, कारण ज्या पध्दतीने अविनाश धनवेला संपवण्यात आले ती पध्दत महाराष्ट्राला हादरवून टाकणारी होती.पंढरपूरला जात असतानाच अविनाश धनवेची इंदापूर येथील जगदंबा हाॅटेलमध्ये शनिवारी रात्री हत्या करण्यात आली.हत्येचा व्हिडीओ देशभर वायरल झाला आहे.अविनाश धनवे हत्याकांड प्रकरणात अविनाशच्या पत्नीने पोलिसांत धाव घेत 10 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Avinash Dhanave News)
मयत अविनाश धनवे याची पत्नी पूजा अविनाश धनवे हिने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार २७३/२०२४ क्रमांकाने भा.दं.वि.का.क. ३०२, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, १०९ भारतीय शस्त्र अधि. कलम ३, २५,२७ म.पो.का.क. ३७(१), १३५ अन्वये खुशाल तापकिर, विशाल तापकिर, मयुर पाटोळे, राहुल चव्हाण, देवा सुतार, मयुर मानकर, शिवा बेडेकर, प्रकाश उर्फ पप्पु बनकर, सतिष पांडे, प्रणिल उर्फ बंटी मोहन काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जण अविनाशला घरी बोलवायला आले होते. तो त्यांच्यासोबत बाहेर गेल्यावर कट रचून त्याची हत्या करण्यात आली आहे. असं अविनाशच्या पत्नीने फिर्यादीत म्हटलं आहे.
संपुर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या हत्याकांड प्रकरणातील आरोपींच्या शोधासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी जोरदार कंबर कसली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाल करत शिवाजी बाबुराव भेंडेकर, वय ३५ वर्षे, मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे वय २० वर्षे, सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे वय २० वर्षे, सोमनाथ विश्वंभर भत्ते, वय २२ वर्षे, या चौघा आरोपींना अटक करण्याची धडक कारवाई केली आहे. आरोपींना पुणे कोल्हापूर महामार्गावरील शिंदेवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक संजय जाधव, रमेश चोपडे, उपाधीक्षक भाऊसाहेब ढोले, स्वप्निल जाधव, सुदर्शन राठोड,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूरचे निरीक्षक सूर्यकांत कोकणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, अमित सिदपाटील, अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवले, राजू मोमीन, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अजय घुले, प्रकाश वाघमारे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे, विक्रम तापकीर, दिपक साबळे, संदीप वारे, बाळासाहेब खडके, राहुल घुबे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, निलेश शिंदे, काशिनाथ राजापुरे, अक्षय सुपे, दगडू विरकर इंदापूर पोलीसठाण्याचे सहायक निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक गरड, अंमलदार प्रकाश माने, सचिन बोराडे, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, अमित यादव, काळे, माधुरी लडकत यांनी केली.
विरोधी टोळीने केला अविनाश धनवेचा खून
गेल्या काही महिन्यांपासून अविनाश धनवे याने आळंदी भागात स्वत:ची वेगळी टोळी निर्माण केली होती. या भागात तो कोयतक गँग चालवत होता. यामधून तो नगरिकांमध्ये दहशत पसरवत होता, तसेच परिसरात स्वत:चे वर्चस्व निर्माण करू पाहत होता. त्याच्यासह पुण्यात अन्य काही टोळ्यांचा देखील सुळसुळाट आहे. श्रेयवादाच्या लढाईतूनच अविनाशची हत्या करण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूर बाह्यवळणावर असणाऱ्या एका हॉटेलमध्ये अविनाश बाळू धनवे रा. आळंदी पुणे (Avinash Balu Dhanave Aalandi Pune) हा आपल्या मित्रांसह जेवणासाठी बसला होता. जेवण येण्याआधी हाॅटेलमध्ये काही युवक घुसले त्यांनी अविनाश धनवे (avinash Dhanave) याची गोळ्या घालून त्यानंतर कोयत्याने वार करून हत्या (murder) केली. या हत्याकांडाच्या घटनेने मोठी खळबळ उडवून दिली आहे. (Avinash dhanave murder news)
आळंदी येथील सराईत गुन्हेगार अविनाश धनवे याची इंदापूरात निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संपुर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेचा पोलिसांनी वेगाने तपास हाती घेतला आहे. अविनाश धनवे हत्याकांड प्रकरणात 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत. लवकरच हे आरोपी गजाआड होतील असा विश्वास पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.
मयत अविनाश धनवे हा मोक्कातील आरोपी होता, त्याच्यावर हल्ला करणारे सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. अविनाशची हत्या त्याच्या अत्यंत जवळच्या मित्राने केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. ज्याला भावासारखं जपलं त्याच मित्राने आपल्या साथीदारांसह अविनाश धनवेचा गेम वाजवला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अविनाश धनवे हा पंढरपूरला जात असताना तो इंदापूर येथील एका हाॅटेलमध्ये त्याच्या तिन मित्रांसह जेवायला बसला होता. त्याचवेळी त्याची गोळी घालून आणि कोयत्याने वार करत हत्या करण्यात आली. अविनाश धनवेच्या मित्राशी संगनमत करून हल्लेखोरांनी अविनाश धनवे याची हत्या केली असे पोलिस तपासात समोर आले आहे.
अविनाश धनवे हत्याकांडातील सर्व आरोपी हे लँड डिलिंगशी संबंधित आहेत. जमीन खरेदी विक्री तसेच बेकायदा ताबा मिळवणे अशा व्यवहारात त्यांच्यावर आळंदी, चाकण आणि चऱ्होली परिसरात अनेक गुन्हे दाखल आहेत. लँड माफियांच्या टोळी युद्धातूनच ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही राज्यभरात व्हायरल झालं आहे, त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली आहे. आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी वेगवेगळी पथके कार्यरत केली आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील असे पोलिसांनी सांगितले.
शनिवारी रात्री इंदापूरात नेमकं काय घडलं ?
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Pune Solapur Highway) इंदापूर बाह्यवळणावर हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट (Hotel Jagdamba Indapur) आहे. या ठिकाणी जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह चार युवक बसले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर ते जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या. परंतु पुढे काय घडणार आहे, याची चौघांना कल्पना नव्हती. चौघे जण जेवणासाठी बसलेले असताना दोन युवक हॉटेलमध्ये घुसले. त्यांनी थैलीत आणलेली पिस्तूल काढले आणि चौघांपैकी अविनाशवर गोळीबार सुरु केला. त्यानंतर आणखी काय युवक आले. त्यांनी अविनाशवर कोयत्याने वार सुरु केले. त्यानंतर काही सेंकदात सर्व जण हत्या करुन फरार झाले. (Avinash dhanave murder case)
यावेळी अविनाशसोबत असणारे तिघे प्रचंड घाबरले. त्यांनी पळ काढला. ही सर्व घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे.शनिवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान या हल्लाची माहिती वाऱ्यासारखी परिसरात पसरली. त्यानंतर हॉटेलमध्ये मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.मयत अविनाश धनवे हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. गुन्हेगारीच्या वादातूनच त्याची हत्या झाली असण्याची शक्यता आहे. (Avinash dhanave pune news)
कोण आहे अविनाश धनवे ?
अविनाश धनवे हा आळंदीमधील कोयता गॅंगचा म्होरक्या होता. गेली पंधरा वर्षापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात होता. त्याच्यावर आळंदी आणि भोसरी पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहे. तो येरवडा कारागृहात असताना त्या ठिकाणी त्याची काही कैद्यांसोबत त्याची हाणामारी झाली होती. तो मोक्कातील आरोपी आहे. (Avinash Dhanave murder news pune indapur)