Baba Siddique bishnoi gangster : बिश्नोई गँगने घेतली माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी ! कोण आहे लाॅरेन्स बिश्नोई गँग ? जाणून घ्या

Baba Siddique latest News in marathi : राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी (baba Siddiqui) यांची १२ ऑक्टोबर रोजी रात्री साडे आठ वाजता गोळीबार (firing) करून हत्या (murder) करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लाॅरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. याबाबत बिश्नोई गँगने (bishnoi gangster) सोशल मिडीयावर भली मोठी पोस्ट लिहीत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. पोलिसांचा बिश्नोई गँगवर संशय होता, तो आता खरा ठरला आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँग पोस्ट जशीच्या तशी

ओम जय श्री राम, जय भारत

“मला जीवनाचे सार समजते. मी शरीर आणि पैसा याला धूळ मानतो. तेच सत्कर्म केले गेले, तेच मैत्रीचे कर्तव्य होते. सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होते पण तू आमच्या भावाचे नुकसान केले. आज जे बाबा सिद्दी यांचं कौतुक केले जातेय, पण एक वेळ तो दाऊदसोबत मोक्का कायद्याखाली होता”.

“त्याला मारण्याचे कारण म्हणजे अनुज थापन आणि दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणे आहे. आमचे कोणाशीही शत्रूत्व नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो, त्यांचा हिशोब ठेवा…. जर कोणी आमच्या भावाला मारले तर आम्ही नक्कीच प्रतित्युत्तर देऊ … जय श्री राम जय भारत”, असं बिश्नोई गँगने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बाबा सिद्धीकी यांच्या हत्येचे कारण आणि त्या हत्येचा मुख्य सुत्रधार कोण याचा तपास कऱण्यात पोलिसांना यश आले आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंगने बाबा सिद्धीकी यांची हत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याच निमित्ताने पुन्हा एकदा बिश्नोई गँग चर्चेत आली आहे. पण हा लॉरेन्स बिश्नोई कोण आहे. ही बिश्नोई गँग कोण आहे, चला तर मग जाणून घेऊयात.

पंजाबमधील फिरोजपूर येथे 12 फेब्रुवारी 1993 रोजी लॉरेन्स बिश्नोईचा जन्म झाला. लॉरेन्सचे वडील 1992 मध्ये हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाले. मात्र पाच वर्षांनी नोकरी सोडून त्यांनी शेती सुरू केली. लॉरेन्सने पंजाब विद्यापीठातून एलएलबी पूर्ण केले आहे. 2009 मध्ये शिक्षणादरम्यान तो पंजाब विद्यापीठाच्या एका विद्यार्थी संघटनेत सामील झाला.

त्यादरम्यान त्यांनी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्ष गोल्डी ब्रार याच्याशी भेट झाली. गोल्डीला भेटल्यानंतर आणि विद्यापीठाच्या विद्यार्थी राजकारणात सामील झाल्यानंतर बिष्णोईची पावले गुन्हेगारीच्या जगाकडे वळला. तो बेकायदेशीर कामात अडकू लागला. जवळपास दोन दशकांनंतर, लॉरेन्स बिश्नोई हा एक गुन्हेगारी जगतातला चेहरा म्हणून ओळखला जाऊ लागला.

लॉरेन्स बिश्नोईच्या विरोधात राष्ट्रीय तपास संस्था आणि दिल्ली पोलिसांनी बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. लॉरेन्स सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगातील तुरुंग क्रमांक 8 मधील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये कैद आहे. लॉरेन्स बिश्नोईवर खून आणि खंडणीचे दोन डझन गुन्हे दाखल आहेत.

लॉरेन्स बिश्नोई टोळी देशातील सर्वात मोठी टोळी बनली आहे. या टोळीत 600 शूटर्स आहेत. लॉरेन्स बिश्नोई टोळीचे जाळे देशभर पसरले आहे. या टोळीचे गुंड पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि राजस्थानमध्ये सक्रिय आहेत.ही टोळी कॅनडा आणि दुबईतूनही कार्यरत आहे.

लॉरेन्स बिश्नोई टोळीची बंबीहा गँगशी स्पर्धा आहे.लॉरेन्स बिश्नोई टोळीचे तीन साथीदार, रोहित गोदारा, संपत नेहरा आणि वीरेंद्र चरण हे गुन्हे नियोजन, पैशाचा हिशेब आणि शस्त्रास्त्रे पुरवण्याची जबाबदारी सांभाळतात.

सुखदेव सिंग गोगामेडी हत्याकांडातही लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याचे बोलले जाते.लॉरेन्स बिश्नोईवर सलमान खानवर दोनदा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.

लॉरेन्स बिश्नोईवर सिद्धू मूसवाला यांच्या हत्येचाही आरोप आहे.गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सध्या साबरमती मध्यवर्ती कारागृहातील उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवण्यात आला आहे. पण त्याने आपले जाळे अशा प्रकारे पसरवले की तो तुरुंगात असो की बाहेर याने त्याला फारसा फरक पडत नाही.

याचा अर्थ असा की, तुरुंगात बसून तो अगदी सहजतेने वाटेल ते करतो. तुरुंगात बसून तो आपल्या शत्रूंच्या नावे कंत्राटे घेतो आणि तुरुंगात बसून करोडो रुपये वसूल करतो. एनआयएच्या चौकशीदरम्यान, त्याने त्याच्या कामाची संपूर्ण मोडस ऑपरेंडी आणि त्यातील प्रत्येक सत्य उघड केले होते.