Baba Siddique latest News : माजी मंत्री बाबा सिद्दीकी खुन प्रकरणात समोर आली सर्वात मोठी माहिती

Baba Siddique latest News in marathi : राज्याचे माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (ncp) जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी (baba Siddiqui) यांच्यावर गोळीबार करत त्यांचा खून करण्यात आला. (firing). ही घटना वांद्रे पुर्व मधील (Bandra East Khair Nagar) खैर नगर परिसरात शनिवारी रात्री (12 रोजी) घडली.या प्रकरणी दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुंबईत (mumbai) बाबा सिद्दीकी यांचा खुन (murder) का करण्यात आला ? याबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे.

फटाक्यांच्या आवाजाचा फायदा उचलत बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईत गोळीबार करण्यात आला. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांचा खून वांद्रे पूर्वेकडील संत ज्ञानेश्वर नगर एसआरए प्रकल्पाच्या वादातून झाली असावी, असा अंदाज सूत्रांकडून वर्तवला जात आहे. या प्रकल्पाला सिद्दीकी पिता पुत्रांचा विरोध होता.

संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत हरियाणामधील एका विशिष्ट समुदायाचे लोक मोठ्या प्रमाणात राहतात. झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध केल्याच्या रागातून सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला, अशी चर्चा आहे. याबाबत पोलिसांनी अद्यापपर्यंत कुठलीच अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. दुसरीकडे सिद्दीकी यांच्या हत्येमागे लाॅरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याचेही बोलले जात आहे बाबा सिद्दीकीच्या हत्येमध्ये तुरुंगात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा सहभाग असल्याची पुष्टी मुंबई पोलिसांनी केली आहे.

लिलावतीचे डाॅ जलील पारकर काय म्हणाले ?

‘साधारण ९.३० च्या सुमारास बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) रुग्णालयात आणलं गेलं. आम्ही त्यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं. त्यांची पल्स मिळत नव्हती. ब्लड प्रेशरही मिळत नव्हतं. आम्ही त्यांचा ईसीजी काढला तेव्हा तो फ्लॅट लाईन आला. आम्ही त्यांना अतिदक्षता विभागात ठेवलं होतं. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरु केले. रक्तस्त्राव थांबावा आणि ब्लड प्रेशर वर जावं यासाठी डॉक्टरांनी अथक प्रयत्न केले. त्यांना तशी औषधंही देण्यात आली. पण ११.२५ च्या दरम्यान आम्ही त्यांना मृत घोषित केलं. बाबा सिद्दीकींना ( Baba Siddique ) दोन गोळ्या छातीवर लागल्या होत्या आणि त्या आरपार गेल्या होत्या. अत्यंत जवळून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले पण ते वाचू शकले नाहीत.’ अशी माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली.

बाबा सिद्दीकी यांचा खून कसा झाला ?

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे आपले पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी रिक्षातून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. डाॅक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाला होता. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. परंतू स्थानिकांनी यात दोघांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

बाबा सिद्दीकी यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. यातील करनैल सिंग हा हरियाणाचा असून दुसरा आरोपी धर्मराज कश्यप हा उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार असून त्याचा वेगाने शोध घेतला जात आहे, तिघा हल्लेखोरांना मदतीसाठी चौथा आरोपी घटनास्थळी होता तोही फरार आहे.अशी माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.

फटाक्यांची आतिषबाजी अन् गोळ्यांचा आवाज

काही दिवसांपुर्वी माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांना व त्यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. सरकारने आमदार जीशान सिद्दीकी यांना वाय दर्जाची सुरक्षा बहाल केली होती. शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी व झीशान सिद्दीकी हे पिता पुत्र आपल्या कार्यालयातून घरी जाण्यासाठी निघाले होते.

शनिवारी रात्री माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे कार्यालयाबाहेर थांबलेले होते. दसऱ्यानिमित्त दुर्गामातेची मिरवणूक व फटाक्यांची आतिषबाजी सुरु होती. याच संधीचा फायदा उचलत तिघा हल्लेखोरांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर बेछूट गोळीबार केला. तिघांचे चेहरे रुमालाने बांधलेले होते.यावेळी सिद्दीकी यांच्यावर पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यातील तीन गोळी त्यांना लागल्या, त्यातील दोन गोळ्या  छातीत घुसल्याने त्यांचा मृत्यू झाला.

आमदार जीशान सिद्दीकी थोडक्यात बचावले

बाबा सिद्दीकी यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यासाठी तिन्ही हल्लेखोर रिक्षाने आले होते.बाबा सिद्दीकी हे कार्यालयाबाहेर येण्याची ते वाट पाहत होते.सिद्दीकी कार्यालयाबाहेर येताच हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला.यातील काही गोळ्या सिद्दीकी यांना लागल्या, तर काही गोळ्या त्यांच्या गाडीला लागल्या. सिद्दीकी यांच्या एका सहकार्यालाही गोळी लागली.

आमदार झिशान सिद्दीकी यांना फोन आल्याने ते पुन्हा कार्यालयात गेले. ऑफिसमध्ये बसून ते फोनवर बोलत होते. त्याचवेळी त्यांना बाहेर गोळीबार झाल्याचा आवाज आला. ते ऑफिस बाहेर आले. वडिल बाबा सिद्दीकी हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे त्यांनी पाहिले. त्या फोनमुळे झिशान सिद्दीकी यांचा जीव वाचला. सिद्दीकी पिता पुत्रांना एकाच वेळी संपवण्याचा मारेकऱ्यांचा डाव होता अशी माहिती समोर येत आहे. अवघ्या पाच मिनिटांत मारेकऱ्यांनी आपला डाव साधत बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करत खून केला.

25 ते 30 दिवसांपासून सुरु होती रेकी

बाबा सिद्दीकी यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर 9.9 MM गनने गोळीबार गोळीबार केला. पोलिसांनी ही पिस्तूल जप्त केली आहे. घटनास्थळाहून पोलिसांनी काडतुसेही जप्त केली आहे. या प्रकरणाचा तपास दया नायक यांच्याकडे देण्यात आला आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडूनही या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. गेल्या 25 ते 30 दिवसांपासून बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोर पाळत ठेवून होते. सर्व माहिती जमा करूनच हल्लेखोरांनी सिद्दीकी यांच्या खूनाचा कट रचला आणि त्यांची गोळीबार करत हत्या केली. या प्रकरणाचा वेगवेगळ्या अँगलने पोलिसांकडून तपास सुरु आहे.

कोण आहेत बाबा सिद्दीकी ?

जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी हे काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते होते. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे सध्या काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे पक्षाच्या मुंबई विभागाची जबाबदारी होती. 66 वर्षीय बाबा सिद्दीकी हे एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. सध्या त्यांचा मुलगा झीशान हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे.

बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले. 1992 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. बाबा सिद्दीकी 2004 ते 2008 या काळात मंत्रीही होते.बाबा सिद्दीकी हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय होते.