Baipan Bhari Deva Box office collection : ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाला महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद, मोडले सर्व रेकॉर्ड, दुसर्या आठवड्यात बाॅक्स ऑफीस कलेक्शनमध्ये झाली विक्रमी वाढ, किती ? जाणून घ्या !
मुंबई: महाराष्ट्रात ‘बाईपण भारी देवा’ (Baipan Bhari Deva) या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील प्रेक्षकांची विशेषतः महिला वर्गाची मोठी पसंती ‘बाईपण भारी देवा’ (Marathi Film Baipan Bhari Deva) या चित्रपटाला मिळत असल्याचे सध्या दिसत आहे. गेल्या 14 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये मोठी झेप घेतली आहे. या चित्रपटाने अनेक नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. (Baipan Bhari Deva Box office collection)
20 जून रोजी ‘बाईपण भारी देवा’ हा मराठी चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित झाला. तेव्हापासून आजपर्यंत अर्थात 14 दिवसांत या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे बाॅक्स ऑफिसवर या चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. पहिल्या आठवड्यापेक्षा दुसर्या आठवड्यात या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे ‘बाईपण भारी देवा’ च्या कमाईत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे.
केदार शिंदे यांच्या बाईपण भारी देवा या मराठी चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 12. 50 कोटींची कमाई केली होती. मात्र दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने जोरदार मुसंडी मारत 24.85 कोटींची कमाई केलीय. त्यानुसार या चित्रपटाची एकुण कमाई 37.35 कोटी इतकी झाली आहे.
‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या मोने, शिल्पा नवलकर, सुचित्रा बांदेकर, दीपा परब यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाचं कथानक स्त्रियांच्या आयुष्यावर बेतलेलं आहे. महाराष्ट्रात या चित्रपटाला मोठी पसंती मिळत आहे. विशेषता: महिला वर्गाचा या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपट सृष्टीत ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट नवा विक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने घौडदौड करत असल्याचे यावरून दिसून येत आहे.