Amravati ACB Trap Today : 22 हजाराची लाच स्विकारताना गटविकास अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात, प्रशासकीय वर्तुळात उडाली मोठी खळबळ !
Amravati ACB Trap Today : सिंचन विहीरीचे कुशल बिल अदा करण्यासाठी 22 हजार रूपयांची लाच स्विकारताना गटविकास अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्याची मोठी कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती टीमने पार पाडली. ही कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (Pandharakawda Panchayat Samiti BDO ACB Trap News)
यवतमाळ जिल्ह्यातील एका गावातील चार सिंचन विहीरींचे बांधकाम काम पुर्ण झाले होते. सदर बांधकामाचे कुशल बील मिळावे यासाठी पांढरकवडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव (Pandharakawda Panchayat Samiti BDO Vitthal Jadhav) यांच्याकडे देयके सादर करण्यात आली होती.7 ऑगस्ट 2023 रोजी सदर देयकांवर सही करण्यासाठी बीडीओ विठ्ठल जाधव यांनी तक्रारदाराकडे 23 हजार 500 रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे सदर तक्रारदाराने अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबतची तक्रार केली. (Amravati Anti-Corruption Department)
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अमरावती पथकाने 10 ऑगस्ट 2023 रोजी पंचासमक्ष सदर तकारीची पडताळणी केली. यात गटविकास अधिकारी विठ्ठल जाधव हे सिंचन विहीर बांधकामाचे कुशल बिल काढण्याच्या देयकावर सही करण्यासाठी 23 हजार 500 रूपयांच्या लाचेची मागणी करत असल्याचे स्पष्ट झाले. (BDO Vitthal Jadhav ACB Trap News)
त्यामुळे एसीबीच्या पथकाने 10 रोजी आयोजित केलेल्या सापळा कारवाईत बीडीओ विठ्ठल जाधव यांना 22 हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.ही कारवाई यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा पंचायत समिती कार्यालयात करण्यात आली. (Pandharakawda Panchayat Samiti Yavatmal)
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अमरावती परिक्षेत्रचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप, अपर पोलीस अधीक्षक देविदास घेवारे, पोलीस उपअधिक्षक शिवलाल भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिल्पा भरडे यांच्या पथकाने पार पाडली. या पथकात पोनि प्रविण बोरकुटे, पो. नि. केतन माजरे, पोलीस अंमलदार वैभव जायले, शैलेश कडु, उपेंद्र थोरात, चित्रलेखा वानखडे, पोउपनि प्रदिप बारबुदे, पोहवा. चंद्रकांत जनबंधु यांचा समावेश होता. (Amravati ACB Trap News Today)