मुंबई : लाचखोर GST अधिकाऱ्याला अटक, ऑफीस व घर झडतीत CBI च्या हाती लागले मोठे घबाड !

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : कंपनीच्या प्रलंबित जीएसटी (GST) प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी 15 लाखांची लाच (Bribe) मागणी करून लाचेचा 5 लाख रूपयांचा पहिला हप्ता स्विकारताना जीएसटी अधिकाऱ्याला (GST Officer Hemant kumar arrest) अटक करण्याची धडक कारवाई सीबीआयने (CBI reaid) केली आहे. सीबीआयने संबंधित अधिकाऱ्याच्या ऑफीस आणि घराची झाडाझडती घेतली असता रोख 43 लाख रूपये, जमिनींचे कागदपत्रे असे घबाड सीबीआयच्या हाती लागले.

Bhiwandi CGST Commissionerate Superintendent Hemant Kumar arrested, CBI arrests GST officer Hemant kumar in bribery case, 43 lakhs were found in house search of GST officer,

सीजीएसटीच्या भिवंडी आयुक्तालयातील अधीक्षकाला केंद्रीय अन्वेषण विभागानं लाच घेतल्याप्रकरणी अटक केलीय. हेमंत कुमार (Hemant kumar cbi news) असं, या अधीक्षकाचं नाव आहे. एका कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी अधीक्षक हेमंत कुमारनं तक्रारदाराकडं 15 लाख रुपयांची लाच मागितली होती. लाचेचा पहिला 5 लाख रुपयांचा हप्ता घेताना सीबीआयनं अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं. लाचखोर अधीक्षकाला न्यायालयानं 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठवलं आहे.

कंपनीच्या प्रलंबित जीएसटी प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी अधीक्षक हेमंत कुमारनं 30 लाख रुपयांची मागणी केली होती. यासंदर्भातील तक्रार सीबीआयकडं करण्यात आली होती. त्यानुसार सीबीआयनं तपास सुरू केला. हेमंत कुमारनं 15 लाख रुपयांची मागणी करुन तक्रारदाराकडून तो लाचेचा 5 लाख रुपयांचा पहिला हप्ता घेणार होता. याची माहिती सीबीआयला मिळाल्यानंतर सीबीआयच्या पथकानं सापळा रचून हेमंत कुमारला अटक केली.

सीबीआयनं हेमंत कुमारच्या मुंबई आणि गाझियाबाद येथील कार्यालय तसेच घराची झडती घेतली. त्यावेळी सीबीआय अधिकाऱ्यांना 42 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम तसेच स्थावर मालमत्तेशी संबंधित काही कागदपत्रं सापडली. सीबीआयनं जप्त केलेल्या ऐवजासह हेमंत कुमारला न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं त्याला 21 ऑगस्टपर्यत पोलीस कोठडीत पाठवलं आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कुणाचा हात आहे का? याचा तपास सीबीआय करत आहे.