जामखेड टाईम्स वृत्तसेवा : शनिवारी केंद्र सरकारने 200 रुपयांनी घरगुती गॅस स्वस्त करण्याबरोबरच पेट्रोल – डिझेलवरील अबकारी कर कमी करत महागाईने होरपळून निघालेल्या देशातील जनतेला दिलासा दिला होता. आता महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने राज्यातील जनतेला मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. (Big decision of Thackeray government, reduction in VAT on petrol and diesel in maharashtra, great relief to the people)
ठाकरे सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे इंधन दरवाढीने होरपळून निघत असलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने पेट्रोल 2 रूपये 8 पैसे तर डिझेल 1 रुपया 44 पैश्यांनी स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पेट्रोल – डिझेलवरील VAT कमी केल्याने इंधनाच्या दरात घट झाली आहे. या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर 2500 कोटींचा वार्षिक भारी पडणार आहे.
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांनी स्वस्त झाले होते. आता ठाकरे सरकारने VAT कपातीचे निर्णय घेतल्याने पेट्रोल आणि डिझेल आणखीन स्वस्त झाले आहे.
ठाकरे सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील VAT कपातीचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. (Big decision of Thackeray government, reduction in VAT on petrol and diesel in maharashtra, great relief to the people)