मुंबई: सक्त वसुली संचानालय अर्थात ईडीने (Ed Raid) बुधवारी मोठी कारवाई केली आहे. वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत (sachin sawant irs) यांना लखनौ (Lucknow) येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सचिन सावंत हे कस्टम आणि जीएसटी विभागाचे अतिरिक्त संचालक आहेत. वरिष्ठ सनदी अधिकारी असलेल्या सचिन सावंत यांच्यावर 500 कोटींच्या घोटाळ्याचा ईडीकडून आरोप करण्यात आला आहे. सावंत यांना लखनौ येथून इडीने बुधवारी अटक केली आहे. या कारवाईने सर्वत्र खळबळ उडवून दिली आहे. (Additional Director of Customs and GST Department Sachin Sawant arrested by ED)
कस्टम आणि जीएसटी विभागाचे अतिरिक्त संचालक सचिन सावंत यांना ईडीने लखनौ येथून अटक केली आहे. ईडीने त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानावर छापा टाकला आहे. (ED Mumbai Raid today) ईडीचं पथक सावंत यांच्या नातेवाईकांची सध्या चौकशी करत असल्याची माहिती पुढे येत आहे.
सीमाशुल्क आणि जीएसटी विभागात कार्यरत अधिकारी सचिन सावंत, लखनौ, यूपी यांना बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्यांची यापूर्वी अंमलबजावणी संचालनालय, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना लखनौहून मुंबईत चौकशीसाठी आणले जात आहे, अशी.माहिती ईडीने दिली आहे.