जामखेड टाइम्स वृत्तसेवा : खरी शिवसेना कोणाची ? या वादावर निवडणूक आयोगाच्या कोर्टात होण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटांनी निवडणूक आयोगाकडे आज आपापली कागदपत्रे सादर केली. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना चिन्ह आम्हालाच मिळावे असा दावा दोन्ही गटांनी केला होता. मात्र आता निवडणूक आयोगाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे अधिकृत चिन्ह धनुष्यबाण निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. त्यामुळे आता अंधेरी पोटनिवडणुकीसाठी हे चिन्ह शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही.
ठाकरे आणि शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष आणि चिन्हाबाबत कागदपत्रे सादर केल्यानंतर दिल्लीत निवडणूक आयोगाची आज बैठक पार पडली. चार तास चाललेल्या या बैठकीनंतर शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून रात्री घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे गटाला मोठा हादरा बसला आहे.
जे चिन्ह शिवसेनेच्या अस्मितेशी जोडलेलं होतं, ते धनुष्यबाणाचं चिन्ह आता शिवेसेनेच्या हातातून निसटलं आहे. निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीच्या तोंडावर हा तात्पुरता निर्णय देत हे चिन्ह गोठवलं आहे. त्यामुळे दोन्ही गटांना आता हे चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांचा या चिन्हावर दावा असणार नाहीये. सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी तीन पर्याय दुपारी तीनपर्यंत सादर करावे लागतील.
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने तात्पुरत्या स्वरुपात गोठवलं आहे. शिवसेना हे नावही उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. शिवसेना कोण याचा फैसला निवडणूक आयोगाला करता न आल्यामुळे हा अंतरिम निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे अंधेरी पोटनिवडणुकीत उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण हे चिन्ह वापरता येणार नाही. हा निर्णय तात्पुरत्या स्वरुपाचा असून केवळ आगामी निवडणुकापुरता मर्यादित आहे. हा निर्णय बदलला जाऊ शकतो. आता उद्धव ठाकरे कोणतं चिन्हं निवडणार याची उत्सुकता आहे
वाचा निवडणूक आयोगाचा निकाल ⤵️