Manoj Jarange Patil latest News Today : मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी गावात आमरण उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली आहे. महाराष्ट्र आज अनेक ठिकाणी बंद पाळून जरांगे पाटील यांच्या अंदोलनास पाठिंबा देण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला गर्भित इशारा दिल्यानंतर सरकार खडबडून जागे झाले आहे. सरकारने मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी एकदिवसीय विशेष अधिवेशन घेण्याची घोषणा आज बुधवारी केली आहे.
बुधवारी मुंबईत मंत्रिमंडळाची कॅबिनेट बैठक पार पडली या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मंगळवार २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे एक दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यास राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मनोज जरांगे पाटील यांच्या अंदोवनापुढे सरकार पुन्हा एकदा नमले आहे. या निमित्ताने जरांगे पाटील यांनी अर्धी लढाई जिंकल्याचे बोलले जात आहे.
मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढला. मात्र त्याचे कायद्यात रूपांतर न झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अंदोलन हाती घेतले आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. त्यांच्या नाकातून रक्त स्त्राव आल्याचीही घटना घडली होती. त्या आधी त्यांच्याशी चर्चेस आलेल्या शिष्टमंडळाला त्यांनी आपल्या गावरान शैलीत चांगलेच खडसावले होते.
जरांगे पाटील यांनी हाती घेतलेल्या अंदोलनास पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. जरांगे पाटील यांनी हाती घेतलेले अंदोलन तीव्र बनताच राज्य सरकार खडबडून जागे झाले. सरकारने एकदिवसीय विशेष अधिवेशन घेण्याची तयारी दर्शवली आहे. तसा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला असून तो स्वीकारुन तुम्ही त्याचे कायद्यात रुपांतर करा. यासाठी विशेष अधिवेशन बोलवा. सरकारने दोन दिवसात तातडीने अधिवेशन बोलवावं. आम्ही सांगितलं, त्याप्रमाणे सग्या-सोयऱ्यांची व्याख्या करावी. मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत आमरण उपोषण सुरु ठेवणार आणि उपचार, अन्नपाणी काही घेणारच नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते. दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्त आलं होतं. त्यासोबतच त्यांचं पोटंही दुखू लागलं होतं. त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला होता. जोवर सरकार ठोस निर्णय घेत नाही तोवर कुठलीच चर्चा नाही असा निर्धार त्यांनी केला.