राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर, कोणत्या मंत्र्याला कोणते खाते मिळाले पहा संपुर्ण मंत्रिमंडळाची यादी
मुंबई : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारत शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली होती. शपथविधी होऊन दहा बारा दिवस उलटूनही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले नव्हते. परंतू आज मुख्यमंत्र्यांनी खात्यात फेरबदल करून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना खातेवाटप जाहीर केले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अर्थ व नियोजन खाते देण्यात आले आहे.
भाजपा शिवसना सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील 9 मंत्र्यांना खातेवाटप जाहीर झाले आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या मंजुरीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खातेवाटप जाहीर केले आहे. खातेवाटपात राष्ट्रवादीला वजनदार खाती मिळाली आहेत. खातेवाटपात शिंदे गटाचे तीन तर भाजपकडील 6 खाते राष्ट्रवादीला देण्यात आले आहेत. अर्थ, कृषि, सहकार, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन, मदत आणि पुनर्वसन, क्रिडा, महिला व बालकल्याण ही महत्वाची खाती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना देण्यात आली आहेत.
राष्ट्रवादीच्या 9 मंत्र्यांना मिळालेले खाते खालील प्रमाणे
1) अर्थ व नियोजन – अजित पवार
2) कृषी – धनंजय मुंडे
3) सहकार- दिलीप वळसे पाटील
4) वैद्यकीय शिक्षण – हसन मुश्रीफ
5) अन्न नागरी पुरवठा – छगन भुजबळ
6) अन्न आणि औषध प्रशासन – धर्मराव अत्राम
7) मदत आणि पुनर्वसन – अनिल पाटील
8) क्रीडा- संजय बनसोडे
9) महिला बालकल्याण – अदिती तटकरे
राज्य मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांचे खातेवाटप खालील प्रमाणे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर २६ मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास
सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य
चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास
गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन
गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)
संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण
धनंजय पंडितराव मुंडे – कृषि
सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार
संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
उदय रविंद्र सामंत- उद्योग
प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),
अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन
दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन
अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण
शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क
कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास
संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे
मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता
अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.