Jamkhed Car Accident News : जामखेडमध्ये भल्या पहाटे भीषण अपघात, धावती कार डिव्हाडरला धडकून पेटली, भीषण आगीत पोलिस कर्मचाऱ्यासह 2 जणांचा होरपळून मृत्यू, दुर्दैवी घटनेने जामखेड तालुका हादरला
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Jamkhed Car Accident News Today : भल्या पहाटे जामखेड शहरातून एक धक्कादायक घटना (Shocking incident) समोर आली आहे. भरधाव कार (car) दुभाजकाला धडकून पेटल्याची (fire) खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत कार जळून खाक (Burn car) झाली. कारमधून प्रवास करणाऱ्या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना बीड रोडवर (jamkhed beed road) आज पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत जामखेड (jamkhed) पोलिस स्टेशनच्या पोलिस कर्मचाऱ्यासह (policeman) एकाचा मृत्यू (Death) झाला आहे. सदर अपघाताच्या घटनेच्या मुळ कारणांचा जामखेड पोलिस (Jamkhed Police Station) कसून तपास करत आहेत. (Jamkhed car accident news today)

मिळालेल्या माहितीनुसार, बीडकडून जामखेडच्या दिशेने येत असलेल्या इर्टिगा गाडी (MH 16 DM 5893) बीड रोडवरील नवले पेट्रोल पंप ते नायरा पंप या दोन पंपाच्या दरम्यान असलेल्या रस्ता दुभाजकाला धडकली. या भीषण अपघातात गाडीतील सीएनजी गॅसने पेट घेतल्याने गाडीला भीषण आग लागली. अपघातामुळे गाडीची लाॅक सिस्टीम बिघडली त्यामुळे गाडीतील दोघांना बाहेर पडता आले नाही. यामुळे या दुर्दैवी घटनेत जामखेड पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल (वय ३५) महादेव काळे (वय २८)( Dhananjay Naresh Goodwal, Mahadev Kale ) या दोघांचा होरपळून मृत्यू झाला.या अपघातात गाडी व गाडीतील दोघांचा अक्षरशः कोळसा झाला. या घटनेने जामखेड तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. (Jamkhed car accident news today)
भल्या पहाटे धावत्या कारने पेट घेतल्याची माहिती समजताच पोलीस निरीक्षक महेश पाटील (पोलिस पथकासह ) व जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केले. पण आगीच्या रौद्ररूपापुढे त्यांचे प्रयत्न तोडके पडले. या घटनेत कार व कारमधील दोघे जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी सर्वात आधी घटनास्थळी दाखल झाले होते. (Jamkhed car accident news today)
अपघातात मयत झालेले पोलीस कर्मचारी धनंजय गुडवाल यांचा मोबाईल अपघातग्रस्त गाडीच्या बाहेर दुभाजकाच्या बाजुला पडला असल्याचे पोलिसांच्या निर्दशनास आले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी शशिकांत वाखारे यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनेची माहिती घेतली. पुढील तपासाच्या सुचना दिल्या. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीस वेगाने करत आहेत. (Jamkhed car accident news today)