सावधान ! पुण्यावर घोंघावतेय GBSचे गंभीर संकट, पुण्यात जीबीएसच्या रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ सुरूच, जीबीएसने पार केली शंभरी

GBS cases in pune : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. गेल्या आठ दिवसांत जीबीएस (gulen bury syndrome in marathi ) आजाराच्या रूग्णसंख्येत मोठा उद्रेक झाला आहे. पुण्यातील जीबीएस रूग्णसंख्या (gbs new cases in pune ) १०१ झाली आहे. शनिवारी रात्री पुण्यातील एका रूग्णाचा सोलापुरात मृत्यू झालाय. त्यातच रविवारी पुण्यात जीबीएस रूग्णसंख्येत २५ ने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. (gbs outbreak in pune)

breaking News, Beware, Serious crisis of GBS is looming over Pune, number of GBS patients continues to increase in Pune, GBS has crossed 100, gbs outbreak in pune, gbs outbreak pune news today marathi,

पुण्यात मागील आठवड्यात जीबीएस आजाराचा शिरकाव झाला. अत्यंत दुर्मिळ आजारात गणल्या जाणाऱ्या या आजाराच्या रूग्णांची मोठी संख्या पुण्यात आढळून आल्याने पुणेकरांची झोप उडवून दिली आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.रविवारी २६ रोजी रूग्णसंख्येत पुन्हा मोठी वाढ झाली आहे. पुण्यात जीबीएस रूग्णांची संख्या आता १०१ इतकी झाली आहे. जीबीएसच्या रूग्णांनी पुण्यात शंभरी पार केल्याने आता सर्वांचेच धाबे दणाणून गेले आहेत (pune virus news marathi)

पुण्यात जीबीएसचे एकुण १०१ रूग्ण आहेत. त्यातील ६२ रूग्ण पुणे ग्रामीण, १९ पुणे महापालिका, १४ पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील आहेत. तर इतर ६ रूग्ण इतर जिल्ह्यातील आहेत. त्यामध्ये ६८ पुरुष व ३३ महिला आहेत. यापैकी १७ रुग्ण व्हेन्टीलेटरवर आहेत. रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. (gbs outbreak in pune)

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना खासगी रुग्णालयात दाखल करावे लागत असून त्यांच्यावरील उपचारांचा खर्च लाखोंच्या घरात जात आहे. आयव्हीआयजी इंजेक्शन आणि प्लाझ्मा फेरेसिस या दोन्ही उपचारपद्धती महागड्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता ससून रुग्णालय आणि महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय येथेही उपचार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जीबीएसने राज्यातील पहिला बळी घेतला आहे. पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये शनिवारी मृत्यू झाला आहे.

पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात गिया बर्रे सिंड्रोमवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी रुग्णालयामध्ये 50 बेड आरक्षित करण्यात आले असून 15 आयसीयू बेडही कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत.

जीबीएस आजाराची लक्षणे-

पायांमध्ये अशक्तपणा, शरीरात थकवा येणे, चेहऱ्याच्या हालचालींमध्ये समस्या येणे, डोळे हलवण्यास त्रास होणे. वेदनेसह खाज सुटणे, लघवीवर नियंत्रण नसणे अर्धांगवायूमुळे पाय, हात किंवा चेहऱ्याच्या स्नायूंवर परिणाम होऊ शकतो. एक तृतीयांश प्रकरणांमध्ये श्वासोच्छवासावर परिणाम होऊ शकतो. गंभीर प्रकरणांमुळे बोलणे आणि गिळणे प्रभावित होऊ शकते. गुंतागुंत वाढल्यास श्वसनक्रिया बंद पडणे किंवा हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो.शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.स्नायु कमकुवत होतात.हात, पायात मुंग्या येतात.अशक्तपणा जाणवू लागतो.बोलण्यास किंवा अन्न गिळण्यास त्रास होणं.धाप लागणे, श्वास घेण्यास त्रास होणं.

जीबीएस आजार : गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे कारण-

ही एक जीवघेणी न्यूरोलॉजिकल स्थिती आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो, परंतु तो सामान्यतः 30 ते 50 वर्षे वयोगटातील लोकांना प्रभावित करतो. तज्ञांच्या मते, गुइलेन-बॅरे सिंड्रोमचे नेमके कारण माहित नाही, पण जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मते, बहुतेक प्रकरणे जंतुसंवेदनशील जीवाणू किंवा विषाणूंच्या संसर्गानंतर होतात. परिणामी, शरीरावरच रोगप्रतिकारक शक्तीचा हल्ला होतो. गुइलेन-बॅरे सिंड्रोम होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे कॅम्पायलोबॅक्टेर जेज्युनी या जीवाणूचा संसर्ग, ज्यामुळे मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या लक्षणांसह गॅस्ट्रोएन्टेरिटिस होतो. कधी कधी, काही लसीही गुइलेन-बॅरे सिंड्रोमच्या जोखमीचे कारण होऊ शकतात, पण हे अत्यंत दुर्मिळ आहे.