Breaking News : ठाकरे गटाच्या नेत्याची हत्या, गोळीबारात जखमी माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यु !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारी एक बातमी मुंबईतून समोर आली आहे. उध्दव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली होती. जखमी अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर घोसाळकर यांच्यावर गोळीबार करणाऱ्या माॅरिस नरोन्हा याने स्वता:वर गोळीबार करत आत्महत्या केली आहे. आज 8 रोजी बोरीवली परिसरात ही घटना घडली होती.
अभिषेक घोसाळकर यांनी मॉरिस नरोन्हा याच्या कार्यालयाला गुरुवारी भेट दिली. या भेटीदरम्यान मॉरिस याने फेसबुक लाईव्ह करीत त्यांना बोलण्याचे आवाहन केले. फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच मॉरिसने अभिषेक यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. पैकी तीन गोळ्या लागल्याने त्यांना बोरिवली येथील करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
दरम्यान, मॉरिस नरोन्हाने अभिषेक यांच्यावर गोळ्या झाडल्यानंतर स्वतःवरही ४ गोळ्या झाडत आत्महत्या केली. पैशांच्या वादातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ‘मॉरिसभाई’ या नावाने ही व्यक्ती बोरिवली आणि दहिसर परिसरात ओळखली जायची. एका वर्षांपूर्वी अभिषेक घोसाळकर यांनी त्याच्या विरोधात दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.