ब्रेकिंग न्यूज : जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला, Vishwambhar Chaudhary, Asim Sarode, Nikhil Wagle प्रवास करत असलेल्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा जीवघेणा हल्ला !

Senior journalist Nikhil Wagle car attack in Pune today : पुण्यात जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आल्याची मोठी घटना समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीची तोडफोड केली आहे. (BJP workers vandalized Wagle’s car) निखील वागळे हे निर्भय बनो (nirbhay bano program in pune) कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आला. या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटत आहेत. पुण्यात “निर्भय बनो” च्या सभेसाठी साने गुरुजी स्मारकाकडे (Sane Guruji Memorial pune) जाताना विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखिल वागळे (Vishwambhar Chaudhary, Asim Sarode, Nikhil Wagle) प्रवास करत असलेल्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांचा जीवघेणा हल्ला. गाडीच्या काचा फोडल्या.

Breaking News, Senior journalist Nikhil Wagle's car attacked in Pune

जेष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्या गाडीवर पुण्यात शनिवारी रात्री हल्ला करण्यात आला. ही घटना खंडोजी बाबा चौकात घडली. निखील वागळे यांनी भाजप आणि भाजपा नेत्यांवर केलेल्या टीकेचे पडसाद आज पुण्यात उमटले. पुण्यातील आक्रमक भाजपा कार्यकर्त्यांनी जेष्ठ पत्रकार निखील वागळे, ॲड असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्या गाडीची तोडफोड केली. यावेळी भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीवर दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला चढवला.

निर्भय बनोच्या सभेसाठी शनिवारी निखील वागळे हे पुण्यात येणार होते. त्यांच्या सभेला परवानगी देऊ नये अशी पुण्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे मागणी केली होती. निखील वागळे आणि त्यांच्या टीमने कोणत्याही परिस्थितीत पुण्यात निर्भय बनोची सभा होणारच असा पवित्रा घेतला होता.

आपल्या तोकड्या बुद्धीचे प्रदर्शन सातत्याने करून सवंग लोकप्रियता मिळविण्यासाठी सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे पत्रकार निखिल वागळे यांचे पुण्यात भाषण होऊ देणार नाही, अशा इशारा पुणे शहर भारतीय जनता पार्टी चे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिला होता. तरी देखील निखिल वागळे पुण्यात आल्याचे पाहून भाजपच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ‘जय श्रीराम’, निखिल वागळे हाय हाय, अशा घोषणा देत वागळे यांची सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला.

निखील वागळे यांच्यावर हल्ला झाला तो क्षण पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारविरोधात काही पुरोगामी कार्यकर्त्यांनी एकत्र येत सरकारविरोधात सभा सुरू केल्या आहेत. यातीलच एक सभा पुण्यात आयोजीत करण्यात आली होती. पुण्यातील अॅड. असीम सरोदे यांच्या निवासस्थानी निखील वागळे थांबले होते. तेथून ते सभास्थळी जात असताना आक्रमक झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी वागळेंच्या कारवर दगडफेक करीत काचा फोडल्या. तसेच कारवर शाईफेक करण्यात आली. या हल्ल्यात असीम सरोदे आणि निखील वागळे थोडक्यात बचावले. पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड सुरु असून परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांचानीही परिसरात बंदोबस्त वाढवला आहे.

‘या’ ट्वीटवरून वाद

निखील वागळे यांनी 4 फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भारतरत्न लालकृष्ण अडवाणी (Nikhil Wagle comment on Advani) यांच्याबाबत एक ट्वीट केले होते. या ट्वीटवरुन पुण्यातील भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. या ट्वीटमध्ये वागळे म्हणाले की, अडवाणींना भारतरत्न म्हणजे एका दंगलखोराने दुसऱ्या दंगेखोराला दिलेली शाबासकी!”

नक्की प्रकरण काय?

निखील वागळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दल ट्वीट केले होते. अडवाणींना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर त्यांनी हे ट्वीट केले होते. या वादग्रस्त ट्वीटवर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. कार्यकर्त्यांनी आक्रमक होत सतत वादग्रस्त वक्तव्य करणारे निखिल वागळे यांची सभा पुण्यात होऊ देणार नाही.

कायदा व सुव्यवस्था रखाण्यासाठी पोलिसांनी सदर भाषणाला परवानगी नाकारावी अशी मागणी पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुणे पोलिसांकडे केली होती. तसेच वागळे यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील दांडेकर पुलाजवळील राष्ट्रसेवा दल येथील हॉलमध्ये संध्याकाळी 6 वाजता निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेल वागळे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते. निखिल वागळे अॅड. असीम सरोदे यांच्या निवास्थानाहून सभास्थळी जायला निघाले. यावेळी त्यांच्या सोबत सुरक्षेसाठी पोलिसही होते.

पुण्यातील डेक्कन भागातील खंडोजी बाब खोपडे चौकात वागळेंची कार आली असता भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच लक्ष्य करीत अंडी, शाईफेक तसेच दगडफेक केली. या हल्ल्यात कारच्या काचा फुटल्या. गाडीवर हल्ला झाल्यानंतरही वागळे कार्यक्रमस्थळी पोहोचले. यात सुदैवाने ते बचावले आहेत. पोलिसांनी परिसरात फौजफाटा वाढवला असून भाजप कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.