Tanaji sawant : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याआधी गोळीबाराने परांडा हादरले, Dhananjay Sawant यांच्या बंगल्यासमोर तुफान राडा, Sonari त नेमकं काय घडलं ? वाचा

जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात, परांड्यात (Paranda) घडलेल्या एका प्रकरणामुळे सावंत हे पुन्हा चर्चेत आले आहेत मंत्री सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत (Dhananjay Sawant) यांच्या सोनारी (sonari) येथील बंगल्यासमोर मध्यरात्री गोळीबाराचा (Firing) थरार रंगला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या दौऱ्याच्या एक दिवसआधी गोळीबाराची घटना घडल्याने परांड्यात मोठी खळबळ उडाली आहे.

tanaji sawant, shook Paranda before Chief Minister's visit, storm Firing in front of Dhananjay Sawant bungalow, what exactly happened in Sonari?

आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांचा सोनारी येथील साखर कारखान्यासमोर बंगला आहे. याच बंगल्यासमोर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी गोळीबार केला. ही घटना मध्यरात्री १२ वाजून ३७ मिनिटांनी घडली असा दावा बंगल्यावरिल सुरक्षा रक्षकांनी केलाय. या प्रकरणी आंबी पोलिस स्टेशनला सुरक्षा रक्षकाने तक्रार दाखल केली आहे. गोळीबार कोणी केला ? का केला ? याबाबत अजून अधिकृत माहिती समोर आली नाही. या घटनेने धाराशिव जिल्ह्यात मोठी खळबळ उडवून दिली आहे.

दोन दिवसापूर्वी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या दौऱ्यात खंडेश्वरी प्रकल्पाच्या कामावरून वाद झाला होता. त्या दृष्टीने या गोळीबाराच्या घटनेचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यावेळी एका आंदोलकाकडे बंदूक होती. पोलीस सुरक्षा असतानाही शस्त्रधारी आंदोलन पालकमंत्री यांच्याजवळ आला होता. असा आरोप धनजय सावंत यांनी केला होता.

या कार्यक्रमात उद्धव ठाकरे गट, शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते व सावंत गटाच्या कार्यकर्त्यात बाचाबाची झाली होती. त्यावेळी तेथे धनंजय सावंत हे उपस्थित होते. त्यामुळेच काल रात्री झालेल्या गोळीबाराला या वादाची किनार आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.

परांड्यात उद्या महायुतीची सभा

परांड्यात उद्या १४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह अन्य बड्या नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या एक दिवस आधी आरोग्य मंत्र्याच्या पुतण्याच्या बंगल्यासमोर गोळीबाराची घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिसांकडून वेगाने तपास घेतला जात आहे. परांड्यात होणाऱ्या महायुतीच्या कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहे.