GBS Outbreak In Pune : ब्रेकिंग न्यूज ! पुण्यात GBSने घेतला पहिला बळी,पुण्यातील जीबीएस रूग्णसंख्या झाली १२७

GBS Outbreak In Pune : पुणे शहर व लगतच्या ग्रामीण भागासह पिंपरी चिंचवड भागात गेल्या काही दिवसांपासून जीबीएस आजाराचा मोठा उद्रेक सुरू आहे. अश्यातच सिंहगड परिसरातील एका ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पुण्यात जीबीएसने हा पहिला बळी घेतला आहे. मृत महिला कँन्सरग्रस्त होती. ससून रुग्णालयात उपचार सुरू असतानाचा सदर महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे. (GBS Death News Pune )

Breaking News,GBS Outbreak In Pune , GBS took its first victim in Pune, number of GBS patients in Pune increased to 127, GBS Death News Pune,

पुण्यात जीबीएस आजाराचा धुमाकूळ सुरू आहे. पुण्यातील जीबीएस रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. सध्या पुण्यातील रूग्णसंख्या १२७ इतकी झाली आहे. पुण्यातील नागरिक जीबीएसमुळे दहशतीखाली आहेत. जीबीएसमुळे राज्यात दोन मृत्यू झाले आहेत. यातील पहिला मृत्यू सोलापूरमध्ये तर दुसरा पुण्यात झाला आहे.

गुइलेन-बॅरे सिंड्रोमचा (GBS) पुण्यात उद्रेक झाल्याचं दिसून येत असून जिल्ह्यातील बाधित गावांत सध्या भीतीचे वातावरण आहे. पुण्यातील विविध भागात जीबीएसचे रुग्ण आढळले असून त्याची गंभीर दाखल आता केंद्राने घेतली आहे. केंद्राच्या सात सदस्यीय पथकानं 29 जानेवारी रोजी पुण्यातील नांदेड गावात भेट देत त्या ठिकाणच्या विहिरीतील पाण्याची पाहणी केली.

केंद्रीय पथकात राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (दिल्ली), निम्हान्स (बंगळुरू), पुण्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागीय कार्यालय आणि राष्ट्रीय विषाणुविज्ञान संस्था (एनआयव्ही) या संस्थांमधील सात तज्ज्ञांचा समावेश होता.
दुसरीकडे संभाव्य परिस्थिती आटोक्यात राहावी यासाठी प्रशासनाकडूनही खबरदारी घेण्यात येत आहे. मात्र GBS च्या रुग्णांवर मोफत उपचारांसाठी नेमलेल्या कमला नेहरू रुग्णालयात एकही न्यूरोलॉजिस्ट नसल्याचे पुढे आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गुलेन बॅरी सिंड्रोम (Guillain Barre Syndrome) हा ऑटोइम्युन आजार असून तो प्रामुख्याने व्हायरल इन्फेक्शननंतर काही आठवड्यांत होतो. मात्र त्यावर उपचार उपलब्ध असल्याने लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचं तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.

काय काळजी घ्यावी?

पाणी उकळून व गाळून प्यावे.
उघड्यावरील व शिळे अन्न खाणे टाळावे.
अचानकपणे हातापायाच्या स्नायूंमध्ये अशक्तपणा जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा जवळील शासकीय रुग्णालयात जावे.

कॅम्पिलोबॅक्टरमुळे जीबीएस कसा होतो?

दूषित पाणी किंवा अन्न खाल्यावर कॅम्पिलोबॅक्टर जेजुनीचा संसर्ग होऊ शकतो.
संसर्गामुळे अतिसार आणि ओटीपोटात वेदना होऊ शकतात.
काही व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती मज्जातंतूंना लक्ष्य करते. ज्यामुळे १ ते ३ आठवड्यांच्या आत जीबीएसचे निदान होते.
याशिवाय, डेंग्यू, चिकनगुनियाचे विषाणू किंवा इतर बॅक्टेरियाच्या संक्रमणामुळे मज्जातंतूंविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती हल्ला करते.

कॅम्पिलोबॅक्टर संसर्गाची लक्षणे

अतिसार
पोटदुखी
ताप
मळमळ किंवा
उलट्या