ब्रेकिंग : शिवसेना आमदार अपात्रता निकालात उध्दव ठाकरे गटाचे आमदार पात्र पण शिवसेना पक्ष म्हणून मान्यता नाही !
मुंबई : महाराष्ट्रासह संपुर्ण देशाचे लक्ष लागलेल्या शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी 10 जानेवारी निकाल दिला. या निकालात शिंदे गटाचे सर्व 16 आमदार पात्र ठरविण्यात आले आहेत. तर गोगावले यांच्या याचिकेच्या निकालात उध्दव ठाकरे गटाचेही आमदार पात्र ठरविण्यात आले. दोन्ही गटांना दिलासा देणारा हा निकाल आहे. मात्र शिवसेना पक्ष म्हणून शिंदे गटाला नार्वेकर यांनी मान्यता दिली. यामुळे हा निकाल उध्दव ठाकरे यांना मोठा धक्का देणारा मानला जात आहे.
नार्वेकर यांनी शिवसेना कुणाची यावर अगोदर निकाल देत त्यात शिंदे गट हीच खरी शिवसेना असा निकाल दिला. यावेळी त्यांनी भरत गोगावलेंचा व्हिप हा वैध असल्याचे सांगितले. त्यानंतर गोगावले यांच्या ठाकरे गटाच्या विरोधात असलेल्या याचिकेचा निकाल देतांना मात्र ठाकरे गटाचे आमदारही पात्र ठरवले.
हा निकाल देतांना नार्वेकर म्हणाले की, दोन्ही गटांकडून घटना मागितली गेली. पण, दोन्ही गटांनी ती दिली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने दिलेली घटना मान्य करण्यात आली. २०१८ साली केलेली घटना ग्राह्य धरता येणार नाही. त्यामुळे १९९९ साली केलेली घटना मान्य केल्याचेही त्यांनी निकाल देतांना सांगितले. त्यानंतर त्यांनी हा निकाल दिला.
शिवसेनेत दोन गट पडले हे २२ जून रोजी लक्षात आले. खरी शिवसेना ठरवण्याचे अधिकार माझेच असेही ते म्हणाले. अपात्रतेचा निर्णय देण्या अगोदर शिवसेना कोणाची याचा निकाल त्यांनी दिला. यावेळी दोन्ही घटनांचे विश्लेषण करण्यात आले. त्यांनी राष्ट्रीय कार्यकारणीचा निर्णय़ अंतिम आहे. पक्षप्रमुखांचे मत अंतिम हे मान्य करता येणार नाही असे सांगितले. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचा युक्तीवाद मान्य करता येणार नाही असेही सांगितले.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी एकूण ३४ याचिकांचा सहा गटात समावेश करून ही सुनावणी पार पडल्यानंतर हा निकाल देण्यात आला. सुमारे २०० पानांचा एक निकाल सहा गटांचा मिळून सुमारे बाराशे पानांचे निकाल पत्र तयार करण्यात आले आहे. सहा गटांतील निकालांचा केवळ सारांश आज वाचण्यात आला.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता याचिकांवर दिलेल्या निकालात काही महत्वाचे मुद्दे मांडले. ते खालील प्रमाणे.
1. २१ जून २०२१च्या बैठकीचे हजेरीपत्रकाची मुळ प्रत व सादर केलेली प्रत यांमधील तफावत यामुळे हा पुरावा ग्राह्य धरता येणार नाही
2. बैठकीला अनुपस्थित राहणे हे अपात्रतेचे कारण ठरू शकत नाही. विधीमंडळ अधिवेशनास अनुपस्थिती हे कारण ठरू शकते
3. संपर्काच्या बाहेर गेले, केवळ याच कारणास्तव आमदारांना अपात्र ठरविता येणार नाही. शिवाय, ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, रविंद्र फाटक यांनी सुरतेत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली हे ही सिद्ध झाले.
4. सत्तांतराच्या काळात खरा पक्ष हा शिंदेंचा हे सिद्ध झाल्याने २१ जून २०२२ च्या शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतील गैरहजरीच्या मुद्दयावर अपात्रता ठरविता येणार नाही.
5. बैठक घेतेवेळी सुनिल प्रभू हे प्रतोद नव्हते. त्यामुळे त्यांनी बजावलेला व्हिप ग्राह्य धरता येणार नाही.
6. मिलिंद नार्वेकर आणि फाटक एकनाथ शिंदेंना सुरतला भेटले त्यामुळे आमदारांशी संपर्क होऊ शकला नाही हे मान्य करता येणार नाही. भरत गोगावले यांनी सांगितले की सगळे आमदार उपस्थित होते. ३ आमदारांनी ही साक्ष दिली आहे की नार्वेकर आणि फाटक शिंदेंना भेटले
7. विधिमंडळ बहुमत ज्याचे असेल त्याचाच पक्ष असतो. त्यामुळे शिंदे गट हीच खरी शिवसेना असून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार पात्र आहेत.
८. भरत गोगावले यांची नियुक्ती योग्य आहे. भरत गोगावलेंची प्रतोदपदी निवड वैध आहे. २१ जून २०२२ रोजी विधीमंडळ सचिवालयाकडे असलेल्या नोंदीनुसार शिंदे गटाकडे बहुमत दिसत आहे. त्यामुळे शिंदे गट हा त्या दिवशी खरा शिवसेना पक्ष असल्याचे दिसून येते.