Baba Siddiqui News :  राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा गोळीबारात मृत्यू, राजकीय वर्तुळात खळबळ

Baba Siddiqui News : मुंबईतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जेष्ठ नेते तथा माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री गोळीबार करण्यात आला आहे. या प्राणघातक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वांद्रे पुर्व भागात घडली. या धक्कादायक घटनेने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

breking, NCP leader Baba Siddiqui killed in firing, excitement in maharashtra political circles, Baba Siddiqui mumbai, latest news,

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शनिवारी रात्री मुंबईत गोळीबार करण्यात आला. वांद्रे परिसरात ही घटना घडली. त्यांच्या तीन चार राऊंड फायर करण्यात आले. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या छातीत गोळी घुसल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने मुंबई सह महाराष्ट्र हादरून गेला आहे.

माजी आमदार बाबा सिद्दीकी हे आपले पुत्र आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी तिघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या घटनेत ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना उपचारासाठी लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू डाॅक्टरांनी तपासणी केली असता त्यांचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. ही घटना बांद्रा पूर्वेतील खैर नगर परिसरात घडली. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाले. या घटनेचा पुढील तपास निर्मलनगर पोलिस करत आहेत.

कोण आहेत बाबा सिद्दीकी ?

जेष्ठ नेते बाबा सिद्दीकी हे काँग्रेस पक्षातील जेष्ठ नेते होते. त्यांचे पुत्र झिशान सिद्दीकी हे सध्या काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. बाबा सिद्दीकी यांनी काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्याकडे पक्षाच्या मुंबई विभागाची जबाबदारी होती. 66 वर्षीय बाबा सिद्दीकी हे एकदा मंत्री तर तीन वेळा वांद्रे पश्चिमचे आमदार राहिले आहेत. सध्या त्यांचा मुलगा झीशान हा वांद्रे पूर्वचा आमदार आहे.

बाबा सिद्दीकी चार दशकांहून अधिक काळ काँग्रेसशी संबंधित होते. मूळचे बिहारचे असलेले बाबा सिद्दिकी यांनी 1990 च्या दशकात मुंबईत निवडणुकीचे राजकारण सुरू केले. 1992 मध्ये ते पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1997 मध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवला. बाबा सिद्दीकी 1999 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 2004 आणि 2009 मध्ये ते पुन्हा विजयी झाले. बाबा सिद्दीकी 2004 ते 2008 या काळात मंत्रीही होते.बाबा सिद्दीकी हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रीय होते.