नांदेड, दि 5 एप्रिल : प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना आज घडली. (Builder Sanjay Biyani murder case in Nanded) गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात दोघे जण संजय बियाणी यांच्यावर अगदी जवळून गोळीबार करत असल्याचे दिसत आहेत. या घटनेने नांदेड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. (CCTV footage of the assassination of builder Sanjay Biyani came to light)
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर आज सकाळी 11 वाजता दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. या घटनेत संजय बियाणी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. गोळीबाराची घटना शारदानगर भागात घडली होती.
बिल्डर संजय बियाणी हे नांदेडमधील आपल्या घरातून बाहेर जात असतानाच दुचाकीवरून आलेल्या दोघा हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. या प्राणघातक हल्ल्यात बियाणी यांना चार गोळ्या लागल्या. गंभीर जखमी झालेल्या बियाणी यांना उपचारासाठी तातडीने हलविण्यात आले होते. परंतू उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.
बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर हत्याकाडांच्या घटनेने नांदेड जिल्हा हादरून गेला आहे. बियाणी यांची हत्या कोणत्या कारणातून झाली ? आणि कोणी केली ? याचा वेगाने तपास केला जात आहे. हल्लेखोरांना पकडण्यासाठी नांदेड पोलिसांचे वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत.
पाहा गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ