शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ स्थापन, खातेवाटपात कोणत्या मंत्र्याला मिळणार मलईदार खाती? अशी असू शकतात संभाव्य खाती
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यात मागील 39 दिवसांपासून सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज राजभवनात पार पडला. भाजपकडून 9 तर शिंदे गटाकडून 9 अश्या 18 मंत्र्यांनी आज पद आणि गोपनियतेच शपथ घेतली. राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला.
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी कधी होणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. क्रांतीदिनाच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळाचा शपथविधी पडला. नव्या सरकारमध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 मंत्री असणार आहेत.
राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात संदीपान भुमरे, उदय सामंत, दिपक केसरकर, तानाजी सावंत,अब्दुल सत्तार, दादा भूसे, गुलाबराव पाटील, शंभूराज देसाई, संजय राठोड, गिरीष महाजन चंद्रकात पाटील, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा, विजयकुमार गावीत, सुधीर मुनगंटीवार,अतुल सावे,राधाकृष्ण विखे-पाटील या 18 मंत्र्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेल्या मंत्र्यांकडे कोणती खाती जाणार याची उत्सुकता राज्याला लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास हे खात कायम राहू शकते तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ आणि गृह ही मोठी खाती जाऊ शकतात. यातून सरकारवर फडणवीसांचा पुर्ण कंट्रोल राहू शकतो.
संभाव्य खाते वाटप असं असू शकतं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – नगर विकास
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – अर्थ आणि गृह
राधाकृष्ण विखे-पाटील – महसुल
गिरीश महाजन – जलसंपदा
सुधीर मुनगंटीवार- ऊर्जा
विजयकुमार गावित – आदिवासी विकास
उदय सामंत – उद्योग
अब्दुल सत्तार – अल्पसंख्याक विकास