CBI Raid Nagpur : लाच प्रकरणात NHAI सरव्यवस्थापक Arvind Kale सह 6 जण अटकेत, नागपुर भोपाळमध्ये सीबीआयची मोठी कारवाई !

CBI Raid Nagpur NHAI Arvind Kale: कंत्राटदार कंपनीकडून लाखो रूपयांची लाच मागणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापकासह 11 जणांविरोधात सीबीआयने (CBI) मोठी कारवाई केली आहे. सीबीआयने 20 लाख रुपयांच्या लाच प्रकरणात NHAI (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) चे जीएम, डीजीएम, खासगी कंपनीचे 2 संचालकांसह 6 जणांना अटक करण्यात आली आहे सीबीआयने नागपुर आणि भोपाळमध्ये धाड टाकत ही कारवाई केली.या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. (CBI raid in Nagpur Bhopal)

CBI Raid Nagpur, 6 people including NHAI General Manager Arvind Kale arrested for taking bribe, CBI Raid in Nagpur Bhopal, Brajesh Kumar Sahu, Anil Bansal, Kunal Bansal, C Krishna, Chattar Lodhi,

ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात अडकले आहेत. एका खासगी कंपनीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कामाचे कंत्राट दिले होते. त्याच्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी लाच मागण्यात आली होती.याच प्रकरणात सीबीआयने रविवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अरविंद काळे (Arvind Kale Arrested) याला 20 लाख रूपयांची लाच घेताना अटक केली. लाचेच्या या रक्कमेची वाटणी 11 जणांमध्ये होणार होती. या कारवाईत 1.10 कोटीची रक्कम जप्त केली आहे.

एका खासगी कंपनीने काम पूर्ण केल्यानंतर बिलाची रक्कम मंजूर करण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे सरव्यवस्थापक अरविंद काळे यांची भेट घेतली. परंतु त्या भेटीच्या दोन महिन्यांनंतरही त्यांनी बिल मंजूर केले नाही. यामुळे कंपनीच्या अधिकाऱ्याने पुन्हा काळे यांची भेट घेतली. त्यावेळी अरविंद काळे यांनी बिल मंजुरीसाठी कार्यालयातील 11 कनिष्ठ अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागेल. अन्यथा बील मंजूर होणार नसल्याचे सांगितले. या प्रकरणी कंत्राटदाराने सीबीआयकडे लेखी तक्रार केली होती. सीबीआयने तक्रारीची शहानिशा केली. त्यानंतर सीबीआयने रविवारी सापळा लावून कारवाई केली.

सीबीआयने अरविंद काळे याच्या घराची झाडाझडती घेऊन 45 लाख रुपये जप्त केले. तसेच मध्यप्रदेशमधील हरदा येथील उपमहाव्यवस्थापक ब्रजेश कुमार साहू (Brijesh kumar sahu), खासगी कंपनीचे दोन संचालक अनिल बन्सल आणि कुणाल बन्सल (Anil bansal, kunal bansal), लाच देणारे दोन कर्मचारी सी. कृष्णा व छत्तर लोधी (C Krishna, chattar lodhi) यांनाही ताब्यात घेतले आहे. या सर्वांकडून 1.10 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहे.

अरविंद काळे यांच्यावर नागपूर विभागात सुरू असलेल्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असून त्यातील एक प्रकल्पाचे कंत्राट भोपाळच्या एका कंत्राटदाराला मिळाले होते. काळे हे पदाचा गैरफायदा घेऊन ही कामे त्या कंत्राटदाराला देत असल्याची देखील तक्रार होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. काळे यांच्या नरेंद्रनगर येथील घराबाहेर सापळा रचण्यात आला होता. रविवारी दुपारी भोपाळचा कंत्राटदार काळे यांच्या घरी येत त्याने काळेंना 20 लाख रुपयांची लाच दिली. त्याच दरम्यान सीबीआयच्या पथकाने धाड टाकत दोघांना रंगेहात पकडले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वेगवान काम आणि पारदर्शक कारभारासाठी ओळखल्या जाते.मात्र, हा सर्व काही देखावा असून प्राधिकरणाच्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापासून ते वर्ग एकच्या अधिकाऱ्यांपर्यंत लाच पोहचल्याशिवाय काम होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे. कंत्राटदारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातील अधिकारी काम करीत नसल्याचे वास्तव सीबीआयच्या कारवाईनंतर समोर आले आहे. या कारवाईमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या स्वच्छ आणि पारदर्शक कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या कारवाईचे राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत.