मोठी बातमी : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील 111 राजकीय पक्षांची मान्यता रद्द, महाराष्ट्रातील 10 पक्षांचा समावेश
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : एकिकडे महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिंदे गटामध्ये टोकाचा संघर्ष पेटला आहे. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकला आहे. याविरुद्ध शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.1 ऑगस्ट रोजी यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना धक्का देणारा मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 10 राजकीय पक्षांची मान्यता रद्द करण्याबरोबरच त्या पक्षांचे निवडणूक चिन्हही गोठवण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने धनुष्यबाण हे चिन्ह आपल्या गटाला द्यावे अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. तर, शिवसेनेने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय प्रलंबित असताना पक्ष आणि निवडणूक चिन्ह याबाबतचा निर्णय निवडणूक घेऊ शकत नाही अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे.
शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात पक्ष आणि निवडणूक चिन्ह कुणाचे यावरून रस्सीखेच सुरु असतानाच निवडणूक आयोगाने देशातील एकूण १११ राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील १० पक्षांचा समावेश आहे.
मोटारसायकल चिखलात अडकली आणि वडिलांसमोरच मुलाने प्राण सोडला
देशातील पक्षांवर राज्यनिहाय झालेली कारवाई
दिल्ली ३३, उत्तर प्रदेश १०, आसाम ९, जम्मू काश्मीर ८, बिहार ६, आंध्र प्रदेश ५, ओरिसा ३, गुजरात ३, केरळ ३, तामिळनाडू ३, मध्य प्रदेश ३, पश्चिम बंगाल २, मिझोराम २, कर्नाटक २, हरयाणा २, पंजाब १, हिमाचल प्रदेश १, राजस्थान १, झारखंड १, मेघालय १, उतराखंड १
बारामती ॲग्रोला आदिनाथ साखर कारखाना भाडेतत्त्वावर देण्यास न्यायालयाचा ब्रेक
महाराष्ट्रातील १० राजकीय पक्षांची मान्यता रद्द
भारतीय आवाज पार्टी – मुंबई
वॉर वेतरणा पार्टी – मुंबई
जनादेश पक्ष – मुंबई
न्युज काँग्रेस – मुंबई
पीपल्स पॉवर पार्टी – मुंबई
राष्ट्रीय लोक जागृती पार्टी – ठाणे
शेतकरी विचार दल – अहमदनगर
भारतीय राष्ट्रीय स्वदेशी काँग्रेस पक्ष – पुणे
विदर्भ विकास पार्टी – नागपूर
विदर्भ राज्य पार्टी – नागपूर