Chandrayaan-3 latest live Updates : चांद्रयान -3 ची ती घटिका समीप आली ! करोडो भारतीयांनो सज्ज व्हा ऐतिहासिक क्षणांसाठी !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : Chandrayaan-3 latest live Updates : संपुर्ण जगाचे लक्ष लागलेल्या भारताच्या चांद्रयान 3 मोहिम आता निर्णायक ठप्प्यावर येऊन ठेपली आहे. गुरूवारी इस्त्रोने चांद्रयान-3 ला प्रोपप्लशन माॅड्यूलपासून विक्रम लँडरला (Vikram Lander) वेगळे केले. चंद्राजवळच्या कक्षेत पोहचलेल्या चांद्रयान 3 च्या विक्रम लँडरचा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे.गेल्या महिनाभरापासून चंद्राभोवती अंडाकृती फिरून चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत पोहचले. गुरुवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला.
चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करण्याची घटिका आता समीप आली आहे. त्याच दिशेने विक्रम लॅंडरची आगेकूच सुरु झाली आहे. प्रज्ञान रोव्हर (Pragyan Rover) सह विक्रम लॅंडर सह चंद्राच्या दिशेने सरकु लागले आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी साॅफ्ट लँडींग होणार आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी करोडो भारतीय सज्ज झाले आहे. या मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर विक्रम लॅंडर प्रज्ञान रोव्हरसह साॅफ्ट लँडींग करणार आहे.
गुरूवारी, चांद्रयान 3 मोहिमेत भारताला मोठे यश मिळाले. विक्रम लॅंडर चांद्रयान 3 च्या प्रोपल्शन मॉड्युलपासून यशस्वीरित्या वेगळे करण्यात इस्त्रोला यश आले. चांद्रयान आता चंद्रापासून अवघ्या 100 किलोमीटर दुर आहे. हे अंतर पार करताना चांद्रयानला चंद्राभोवती चारही बाजूंनी दोन वेळा चक्कर मारायची आहे. त्यानंतर आपली उंची आणि गती कमी करून चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग होणार आहे. हे साॅफ्ट लँडींग 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. या ऐतिहासिक क्षणांसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्त्रोमध्ये उपस्थित राहणार आहेत.
ISRO ने दुपारी 1 वाजता प्रोपल्शन आणि लँडर मॉड्यूल वेगळं करण्याची कामगिरी पूर्ण केली. दरम्यान यानंतर विक्रम लँडर गोलाकार कक्षेत फिरणार नाही. ते पुन्हा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरेल. यानंतर, 8 आणि 20 ऑगस्ट रोजी डीऑर्बिटिंगद्वारे, विक्रम लँडर 30 किमी पेरील्युन आणि 100 किमी अपोलून कक्षेत ठेवले जाईल.
पेरील्यून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून कमी अंतर, तर अपोलून म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागापासून अधिक अंतर. परंतु इंधन, चंद्रावरील वातावरण, वेग इत्यादींवर अवलंबून या कक्षेत किरकोळ फरक असू शकतो. पण याचा मोहिमेवर काही फरक पडणार नाही. पण एकदा 30 किमी x 100 किमीची कक्षा गाठल्यानंतर इस्रोसाठी सर्वात कठीण टप्पा सुरू होईल. तो म्हणजे म्हणजे सॉफ्ट लँडिंग.
30 किमी अंतरावर आल्यानंतर विक्रम लँडरचा वेग कमी होईल. चांद्रयान-3 धीम्या गतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवले जाईल. हा सर्वात कठीण टप्पा असेल.