Chandrayaan-3 : चंद्राच्या कक्षेत पोहचताच चांद्रयान-3 ची ऐतिहासिक कामगिरी, चांद्रयान कुठे आहे ? जाणून घ्या !
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेकडे संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे.चांद्रयान-3 चा महिनाभरापूर्वी सुरु झालेला प्रवास आता अंतिम टप्प्यात आला आहे. चंद्राभोवती अंडाकृती फिरणाऱ्या चांद्रयानने ऐतिहासिक कामगिरी करत चंद्राच्या अगदी जवळ पाऊल ठेवलं आहे. चंद्रापासून 153 किमी × 163 किमी इतक्या अंतरावर चांद्रयान फिरत आहे. चांद्रयान आता चंद्राच्या कक्षेत स्थिरावले, अशी माहिती इस्त्रोने जारी केली आहे.
बुधवारी, इस्त्रोने चांद्रयान मोहिमेत महत्वाचा टप्पा पार करण्यात यश मिळवले. इस्त्रोने बुधवारी यशस्वी फायरिंग केली. यामुळे चांद्रयान चंद्रापासून 153 किमी × 163 किमी अंतरावर स्थिरावले आहे. या टप्प्यावर चांद्रयानाची कक्षा कमी करण्यात इस्त्रोला यश मिळाले आहे. भारताच्या चांद्र मोहिमेत सुवर्णाक्षरांनी नोंदवल्या जाणाऱ्या क्षणाच्या दिशेने महत्वपूर्ण टप्पा चांद्रयान 3 ने पार केला आहे. यापुढे चांद्रयान 3 चा प्रवास महत्वपूर्ण असणार आहे.
चंद्राच्या कक्षेत पोहचलेल्या चांद्रयान 3 च्या पुढच्या प्रवासाबाबत करोडो भारतीयांसह संपुर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, चांद्रयान 3 यापुढं आता प्रोपल्शन आणि लँडर मॉड्युलच्या विभक्तीकरणासाठी तयार होईल. थोडक्यात यानापासून लँडर वेगळं होत त्याचा स्वतंत्र प्रवास करणार आहे. प्रोपल्शन मॉड्युलपासून लँडर 17 ऑगस्ट रोजी वेगळं होणार असल्यामुळं आता शास्त्रज्ञांचीही धाकधुक वाढली आहे
प्रोप्लशन माॅड्यूलपासून लँडर वेगळं होण्याची प्रक्रिया आता सुरु होणार आहे. त्यानंतर चांद्रयान 3 चंद्रावर सॉफ्ट लॅंडींग करणार आहे. साॅफ्ट लँडींग करत असताना लँडर थ्रस्टरच्या मदतीनं हे लँडींग होणार आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर साधारणता: 30 किमीच्या उंचीवरून चांद्रयान 3 चे 23 किंवा 23 ऑगस्ट रोजी साॅफ्ट लँडींग होणार आहे. चंद्राच्या दक्षिण धुव्रावर विक्रम लॅंडरचे लँडींग होईल. त्यानंतर त्यातून प्रज्ञान रोवर बाहेर पडेल. त्यानंतर तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून माहितीचे संकलन करेल.
चंद्राच्या दक्षिण पृष्ठभागावर कायम अंधार असतो. या भागात चांद्रयान उतरवण्याची किमया भारताने यशस्वी केल्यास भारत हा अशी कामगिरी करणारा जगातला पहिला देश ठरेल. भारताच्या या ऐतिहासिक चांद्रयान मोहिमेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.