Chandrayaan-3 Video : चांद्रयान 3 ने पृथ्वीवर पाठवला व्हिडिओ, विक्रम लॅंडरच्या नजरेतून चंद्र कसा दिसतोय ? पहा व्हिडिओ
Chandrayaan-3 Video : भारताची चांद्र मोहिम अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या 23 ऑगस्ट रोजी भारतीय चांद्रयान-3 ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज होणार आहे. विक्रम लॅंडरचा चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने अचूक प्रवास सुरू झाला आहे. संपूर्ण जगाचे लक्ष चांद्रयान 3 च्या साॅफ्ट लँडींगकडे लागले आहे. अश्यातच विक्रम लँडरने चंद्राच्या पृष्ठभागाचा व्हिडिओ तयार केला आहे. हा व्हिडिओ इस्त्रोने सार्वजनिक केला आहे.
चांद्रयान-3 ने एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला आहे. चांद्रयानातील प्रॉपल्शन मॉड्यूल आणि लँडर मॉड्यूल काल (17 ऑगस्ट) एकमेकांपासून वेगळे झाले होते. आता विक्रम लँडर हे चंद्राच्या पृष्ठभागाकडे प्रवास करत आहे.यातच लँडरवरील कॅमेऱ्याने चंद्राची काही दृष्ये टिपली आहेत.
इस्रोने हा व्हिडिओ शेअर केला आहे. प्रॉपल्शन मॉड्यूल पासून वेगळं झाल्यानंतर लगेच लँडर इमेजरने हा व्हिडिओ कॅप्चर केला. सुमारे 30 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. यामध्ये चंद्राचा दक्षिण ध्रुवाजवळील भाग दिसत आहे.
यासोबतच लँडर पोझिशन डिटेक्शन कॅमेऱ्याने देखील चंद्राचा आणखी एक व्हिडिओ घेतला आहे.15 ऑगस्ट रोजी हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता. इस्रोने आज हे दोन्ही व्हिडिओ शेअर केले आहेत.
प्रॉपल्शन मॉड्यूलपासून वेगळं झाल्यानंतर आता लँडर मॉड्यूल हे चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने प्रवास करणार आहे. यासाठी दोन वेळा डी-बूस्टिंग प्रक्रिया राबवण्यात येईल. लँडर मॉड्यूलमध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोन गोष्टींचा समावेश आहे. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करेल.
इस्त्रोने जारी केलेल्या ताज्या अपडेट नुसार, लँडर मॉड्यूल (LM) चे आरोग्य सामान्य आहे. LM ने यशस्वीरित्या डीबूस्टिंग ऑपरेशन केले. ज्यामुळे त्याची कक्षा 113 किमी x 157 किमी पर्यंत कमी झाली.दुसरे डीबूस्टिंग ऑपरेशन 20 ऑगस्ट 2023 रोजी होणार असल्याचे इस्त्रोने म्हटले आहे.