Chembur fire Accident : मुंबईत मोठी दुर्घटना, एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू, चेंबुरमधील सिध्दार्थ काॅलनीतील घटना

मुंबई : ६ ऑक्टोबर २०२४ । मुंबईतून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये आग (Chembur fire accident) लागल्याची भीषण दुर्घटना घडली.या घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे. ही दुर्घटना आज पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास घडली आहे. शाॅर्ट सर्किटमुळे सिध्दार्थ काॅलनीत (Siddharth Colony in Chembur) ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Chembur fire accident, Breaking News, Big accident in Mumbai, 7 people from the same family died, incident in Siddharth Colony in Chembur, latest marathi news,

चेंबुरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये भीषण आगीची दुर्घटना घडली आहे. पहाटे घडलेल्या या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना घाटकोपरच्या राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मृत झालेल्या सात जण मृत्यूमुखी पडले. यात १० व ०७ वर्षीय दोन चिमुकल्या मुला मुलीचा समावेश आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

घराच्या मीटर बाॅक्समध्ये शाॅर्ट सर्किट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. भल्या पहाटे साखर झोपेत असणाऱ्या गुप्ता कुटुंबावर काळाने घाला घातला.या घटनेत प्रेम गुप्ता, अनिता प्रेम गुप्ता, मंजु प्रेम गुप्ता, नरेंद्र गुप्ता, पारिस गुप्ता या पाच जणांसह एकुण सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.सर्व मृत गुप्ता कुटूंबातील आहेत.

चेंबुरच्या सिध्दार्थ काॅलनीत पहाटे पाचच्या सुमारास ही आग लागली. हा परिसर झोपडपट्टीचा आहे. या भागात बहूतांश घरे वन प्लस वन अशी आहे. अश्याच एका घरात गुप्ता कुटूंब राहत होतं. या कुटुंबावर साखर झोपेतच काळाने घाला घातला. आग लागल्याने सात जणांचा मृत्यू झालाय. आग लागल्याची माहिती मिळताच आग्निशमन दल व स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आगीतील जखमींना राजावाडी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू त्यांना मृत घोषित करण्यात आले.