मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 5 मोठ्या घोषणा, Chief Minister Eknath Shinde 5 big announcements
जामखेड टाइम्स वृत्तसेवा : आमचे सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही, घेतलेले निर्णय सरसकट आम्ही बदलणार नाही, ज्याच्यामध्ये चुकीचं काय झालं असेल त्याच्यावर ठरवू तसेच कुठल्याही पद्धतीने आमच्या डोक्यामध्ये ‘ग’ ची बाजा कधी येणार नाही आम्ही जे कार्यकर्ते आहोत ते कार्यकर्तेच राहणार आहोत. आता सरकार बनलं आहे. आदळापट करून उपयोग नाही. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हातात हात घालून काम करूयात असे अवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज बहुमताने विश्वास दर्शक ठराव जिंकला. त्यानंतर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाच्या गोष्टींवर भाष्य करत काही महत्वाच्या घोषणा केल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणा खालील प्रमाणे
- महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल डिझेल स्वस्त होणार
सरकार सूडबुद्धीने काम करणार नाही - ठाकरे सरकारने घेतलेले निर्णय सरसकट बदलणार नाही
- शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार
- राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
- रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.
विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार
विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी अजित पवार यांच्या नावाची घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. त्यानंतर अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा पदभार स्वीकारला.
महाविकास आघाडीतील सर्वात मोठा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडे विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद आले आहे. या पदासाठी राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी अजित पवार यांची विरोधी पक्ष नेता म्हणून निवड करण्यात येत असल्याचे जाहिर केले.