Eknath shinde : मराठा आरक्षण विधेयक मंजूर होताच मुख्यमंत्र्यांचा मराठा बांधवांसोबत जल्लोष, पहा photo
Eknath shinde latest news : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणांची शपथ घेऊन मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची प्रतिज्ञा केली होती. त्यानुसार आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा समाजाला न्याय देणारे आरक्षण विधेयक आम्ही मंजूर (Maratha Reservation Bill passed ) करून मराठा समाजाला दिलेला शब्द मी पूर्ण केला. या निर्णयानंतर विधिमंडळाच्या बाहेर मराठा समाजातील बांधवांच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
‘एक मराठा, लाख मराठा’च्या घोषणांनी संपूर्ण आसमंत दुमदुमून गेला. मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे भरवत आणि गुलाल उधळत हा क्षण साजरा केला. यासमयी क्षणभर त्यांच्या जल्लोषात मी देखील सहभागी झालो. हे आरक्षण कोर्टात टिकवून दाखवू अशी ग्वाही यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली.यावेळी विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सकल मराठा बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
विधिमंडळाच्या आजच्या विशेष अधिवेशनात दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर झाले. सरकारने मराठा समाजाला दिलेल्या वचनाची पूर्तता केल्याने आज विधानभवन परिसरात मराठा बांधवांनी गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष केला.मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आरक्षण मिळवून देत, न्याय दिल्याबद्दल सर्वांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.विविध नेत्यांनी पण त्यांचे आभार मानले, सत्कार केला !