मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांत कुठे कुठे भेटी दिल्या ? काय निर्णय घेतले ? जाणून घेऊयात एका क्लिकवर

जामखेड टाइम्स वृत्तसेवा । सत्तार शेख । राज्याच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची निवड झाली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने विधानसभेत बहुमत सिध्द करत विश्वास दर्शक ठराव जिंकला. राज्यात भाजप प्रणीत शिंदे सरकार सत्तेवर आले. अगामी अडीच वर्षे महाराष्ट्राचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे राज्याचा कारभार हाकणार आहेत.

एकनाथ शिंदे हे भाजपच्या पाठिंब्यावर राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. या सरकारमध्ये भाजपने उपमुख्यमंत्रीपद स्विकारले आहे.मोठे संख्याबळ असतानाही भाजपने मुख्यमंत्रीपद न घेता शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या गटाकडे मुख्यमंत्रीपद दिले.

भाजपने सत्तास्थापन करताना अवलंबवलेल्या राजकीय कृतीचे अनेक जण अनेक अंगांनी अर्थ काढत आहेत. परंतू राज्यात काहीही चर्चा असल्या तरी, राज्यात नवे सरकार कशी कामगिरी करणार याचीच उत्सुकता राज्यातील जनतेला लागली आहे. राजकीय साठमारीत राज्याचे मुळ प्रश्न दुर्लक्षित होणार नाहीत, याची खबरदारी नव्या सरकारला घ्यावी लागणार आहे.

राज्याचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून 30 जून रोजी शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मागील चार ते पाच दिवसांत कुणाच्या भेटी घेतल्या ? कोणते निर्णय घेतले ? हे समजून घेऊयात…

30 जूून 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली. राज्यातील खरीप हंगाम, पाऊस-पाणी आणि पीकविमा याबाबतचा आढावा यावेळी घेण्यात आला. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव उपस्थित होते.

30 जूून 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ बैठक झाली.

30 जूून 2022 : मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

1 जुलै 2022 : महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे जनक, प्रगतीशील शेतकरी तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांचा जयंतीदिन संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. गोव्यात जाऊन शिवसेनेचे सर्व आमदार आणि सहयोगी आमदार यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत वसंतराव नाईक यांची जयंती साजरी केली.

1 जुलै 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला. बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,विविध विभागांचे सचिव तसेच हवामान, रेल्वे, बेस्ट,पालिका, लष्कर, जेएनपीटी आदी संस्थांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

2 जुलै 2022 : ट्विटवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे या दिवशीचे कोणतेही अपडेट उपलब्ध नाहीत.

3 जुलै 2022 : महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनास हजर राहण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुलाबा येथील वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

3 जुलै 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी आमदारांसमवेत विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास वंदन केले.

3 जुलै 2022 : विधानसभेच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची निवड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नार्वेकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

03 जुलै 2022 : बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधी सरकारची रणनिती काय असावी यासंबंधी सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या बैठकीस उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केले.

4 जुलै 2022 : भाजप आणि आपल्या समर्थक आमदारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल. विधीमंडळ अधिवेशनात उपस्थित राहून विश्वास दर्शक ठरावाला सामोरे गेले आणि हा ठराव मोठ्या बहुमताने जिंकला.

4 जुलै 2022 : विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या 3 मोठ्या घोषणा

  • शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याचा शिवसेना-भाजप युती सरकारचा निर्धार
  • राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल.
  • रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी 21 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा.

हुतात्मा स्मारकाला भेट

4 जुलै 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दादर येथील चैत्यभूमीला भेट दिली

4 जुलै 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांना विनम्रतापूर्वक अभिवादन केले.

4 जुलै 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका येथील आनंदाश्रम ला भेट दिली. धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले.

4 जुलै 2022 : ठाणे शहरातील धर्मवीर आनंद दिघे शक्तीस्थळास भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.

5 जुलै 2022 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या निवासस्थानी पहाटे दीड वाजता दाखल झाले. यावेळी त्यांचे कुटुंबीयांनी औक्षण केले.

05 जुलै 2022 : राज्यातील काही भागातील वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली असून सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.

05 जुलै 2022 : हवामान खात्याने मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः परिस्थितीचा आढावा घेत आहेत. पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे तसेच एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

05 जुलै 2022 : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या सदस्यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची निवासस्थानी येऊन आषाढी एकादशीच्या मंगलदिनी पांडुरंगाच्या महापूजेसाठी सहकुटुंब सहपरिवार येण्यासाठी आमंत्रित केले.

05 जुलै 2022 : दादर येथील संयुक्त महाराष्ट्र स्मारकाला भेट देऊन या लढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या योद्ध्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रभादेवी येथील श्री सिध्दीविनायकाचे भक्तीभावाने दर्शन घेतले.