जामखेड टाइम्स वृत्तसेवा : राज्यातील सत्तासंघर्षाचे नाट्य 15 दिवसानंतर शांत झाले. राज्याचे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली आणि राज्यात शिंदे सरकार सत्तेवर आले.मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे (cm eknath shinde) हे सोमवारी पहिल्यांदा आपल्या घरी पोहोचले.त्यावेळी शिंदे समर्थकांनी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केलं.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बहुमत सिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अनेक दिवसांनी आपल्या स्वगृही परतले. मागील १५ दिवसांपासून एकनाथ शिंदे हे कुटुंबापासून दूर होते, शिंदे घरी येताच कुटुंबीय भावुक झाले होते. पण, घरातून बाहेर गेले शिंदे थेट मुख्यमंत्री म्हणूनच घरी परतल्यामुळे त्यांच्या समर्थकांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार दिवसांत कुठे कुठे भेटी दिल्या ? काय निर्णय घेतले ? जाणून घेऊयात एका क्लिकवर
ढोल ताशाच्या गजरात समर्थकांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी त्यांच्या पत्नी लता शिंदे यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात लता शिंदे यांनी ड्रम सेटवर ताबा घेतला आणि चांगलाच ठेका धरला होता. मिसेेस मुख्यमंत्री लता शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांचे अनोख्या स्टाईलने जल्लोषात स्वागत केले. लता शिंदे यांच्या या स्वागताची राज्यात चर्चा रंगली आहे.
घराची पायरी चढताच माझी सौभाग्यवती लता, श्रीकांत, सुनबाई तसेच लाडका रुद्रांश यांनी माझे औक्षण करित स्वागत केले. यासमयी अनेक दिवसांनी माझा नातू रुद्रांश याने मला पाहिल्यावर त्याचाही आनंद गगनात मावत नव्हता. खरं सुखाची अनुभूतीच ही अशी भावनिक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे.