Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार, कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये – आदिती तटकरे

Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सरकारने बंद केल्याच्या बातम्या समोर आल्याने राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते, यावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे. या संबंधी त्यांनी सोशल मिडीयावर पोस्ट लिहिली आहे. पाहूयात त्यांनी काय म्हटले आहे.

Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana will continue, mothers and sisters of Maharashtra should not fall prey to any misinformation - Aditi Tatkare

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार !! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे.तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती अशी पोस्ट आदिती तटकरे यांनी सोशल मिडीयावर लिहिली आहे .

aditi tatkare ladki bahin yojana, Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana will continue, mothers and sisters of Maharashtra should not fall prey to any misinformation - Aditi Tatkare