Harshkumar Kshirsagar : क्लर्कचा पगार १३ हजार पण मैत्रिणीला दिला 4 BHK फ्लॅट, डायमंडचा चष्मा अन् 35 लाखांची BMW कार, हर्षकुमार क्षीरसागरच्या खतरनाक कारनाम्याने सगळेच हैराण, छत्रपती संभाजीनगरमध्ये 21 कोटींच्या भ्रष्टाचाराचा भांडाफोड !

Harshkumar Kshirsagar : छत्रपती संभाजीनगर  : शासकीय विभागात होणाऱ्या भ्रष्टाचारावर सातत्याने बोलले जाते. गडगंड संपत्तीचा मलिदा लाटणाऱ्यांच्या सुरस कहाण्या अनेकदा प्रकाशझोतात येतात तर अनेकदा लाटलेला शासकीय निधी पचवला जातो.परंतू आता छत्रपती संभाजीनगर मधून (Chatrapati Sambhajinagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 13 हजार पगार असलेल्या एका कंत्राटी कर्मचाऱ्याने शासनाचे कोट्यावधी रूपये लाटल्याचे उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Harshkumar Kshirsagar Aurangabad)

Clerk salary is 13 thousand but girlfriend has 4 BHK flat, diamond glasses and BMW car worth 35 lakhs, everyone is shocked by Harshkumar Kshirsagar dangerous exploits, 21 crore corruption scandal in Chhatrapati Sambhajinagar,

हाती काळा पैसा आला की भलेभले भितरतात, तेलगी घोटाळाही असाच उजेडात आला होता. बारबालेवर एका रात्री लाखो रूपयांची उधळपट्टी केल्यानंतर तेलगी घोटाळा उघडकीस आला होता.छत्रपती संभाजीनगरमध्ये असचं काहीसं घडलं आहे. एका साध्या भोळ्या चेहर्‍याच्या दिवट्याने मैत्रिणीवर लाखो रूपये उडवल्यानंतर त्याचा खतरनाक कारनामा उजेडात आला आहे. कंत्राटी कर्मचारी असलेल्षा हर्षकुमार क्षीरसागर (Harshkumar Kshirsagar) या कर्मचाऱ्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शासनाला 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांना गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे.

मैत्रीला 4 बीएचके फ्लॅट अन् 35 लाखांची BMW कार

13 हजार रुपये पगार असणाऱ्या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला 21 कोटी 59 लाख 38 हजार रुपयांचा गंडा घातला. या पैशातून आरोपीने बीएमडब्ल्यू कार, बीएमडब्ल्यू बाइक खरेदी केली, तर मैत्रिणीसाठी विमानतळासमोरील अपार्टमेंटमध्ये 4 बीएचके फ्लॅट विकत घेतला आहे. शहरातील नामांकित ज्वेलर्समध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली होती. तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीने 35 लाखांची एसयुव्ही कार खरेदी केली आहे, अशी धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. हर्षकुमार अनिल क्षीरसागर (Harshkumar Anil Kshirsagar) असं मुख्य आरोपीचे नाव असून, तो एसयुव्ही कार घेऊन फरार झाला आहे.

विभागीय क्रीडा संकुलाच्या निधीतून २१ कोटी ५९ लाख लंपास करणाऱ्या हर्षकुमार क्षीरसागर याने एक-दोन नव्हे, तर तब्बल पाच फ्लॅट खरेदी केल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, त्यापैकी विमानतळ परिसरात प्रेयसीच्या नावावर घेतलेल्या फ्लॅटच्या सजावटीसाठी त्याने चीनहून महागड्या वस्तूदेखील मागवल्या.फ्लॅटमध्ये बदल करण्यासाठी खरेदी केलेले जवळपास २० लाख रुपयांचे साहित्यदेखील आढळल्याचे सूत्रांनी सांगितले.

क्रीडा संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आलं होतं. या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीने धनादेशाद्वारे होतो. मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर, यशोदा शेट्टी (Yashoda Shetty) आणि तिचा नवरा बीके जीवन (BK Jeevan) यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंग साठी ऍक्टिव्हेट करून त्यावरून ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली. विशेष म्हणजे, 6 महिन्यानंतर विभागीय उपसंचालकांना हा धक्कादायक प्रकार लक्षात आला.

हर्षकुमार क्षीरसागरने (Harshkumar Kshirsagar) असा केला घोटाळा

क्षीरसागरने हा घोटाळा करण्यासाठी उपसंचालकांच्या नाव आणि स्वाक्षरीचा वापर करून बँकेस बनावट मजकुराचे पत्र पाठवून खात्याला स्वतःचा मोबाइल क्रमांक जोडला. मोबाईल नंबर जोडल्यानंतर नेट बँकिंग सुविधा सुरू करून घेत पैसे ट्रान्स्फर केले. आतापर्यंत क्षीरसागर, शेट्टी यांच्या खात्यात 59 कोटी आले.बुकमध्ये नोंदी, पावती बुक लिहिणे, बँकेची पत्रव्यवहार करणे असे काम क्षीरसागर आणि शेट्टी करत होते. 2023 पासून त्यांच्या खात्यात जवळपास 59 कोटी सात लाख 82 हजार रुपयांचा निधी आला होता. त्यामधून कोट्यावधी रुपये त्यांनी वळते केले. अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी दिली.

विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासनाला कळलं कसं नाही?

कंत्राटी कर्मचारी इतकी मोठी रक्कम स्वतःच्या खात्यात ट्रान्स्फर करीत असताना क्रीडा उपसंचालक, बँकेतील अधिकारी अनभिज्ञ कसे राहिले, असा प्रश्न आहे. आयकर विभागाच्या नोटिसाही आल्या नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. डल्ला मारलेल्या या पैशांमध्ये मुख्य आरोपी हर्ष कुमार शिरसागर याने आपल्या मैत्रिणीला आलिशान फोर बीएचके फ्लॅट गिफ्ट केला, डायमंडचा चष्मा वापरला आणि बीएमडब्ल्यू सारखी गाडी वापरली.13 हजार पगार असणाऱ्या या आरोपीने महागड्या गाड्या, महागडे फ्लॅट्स आणि डायमंडचा चष्मा वापरला हे जितकं आश्चर्यकारक आहेत तितकंच या संपूर्ण प्रकाराचे विभागीय क्रीडा संकुलाच्या प्रशासनाला कल्पना सुद्धा कशी लागली नाही हा मोठा प्रश्न आहे.

दोन दिवसांपूर्वी क्रीडा विभागाच्या विभागीय क्रीडा संकुलात हा अजब घोटाळा उघडकीस आला. अवघा तेरा हजार रुपये पगार व पदवीपर्यंत शिक्षण असलेला हर्षकुमार कंत्राटी पद्धतीवर लिपिक म्हणून जानेवारी २०२३ मध्ये या विभागात नोकरीस लागला होता. उपसंचालकांच्या लेटरहेडच्या मदतीने बँकेला दिलेल्या अधिकृत ई-मेल आयडीमध्ये बदल करत त्याने विभागाला येणारा निधीच स्वतःच्या विविध खात्यांवर वळता करून अकरा महिन्यांत कोट्यवधींचा घोटाळा केला. यात त्याचे भागीदार असलेले यशोदा शेट्टी व तिचा पती जीवन कार्यप्पा विंदडा यांची पोलिस कोठडीत कसून चौकशी सुरू आहे.

तपास पथकाने मंगळवारी क्रीडा विभागात हर्षकुमारसोबत काम करणाऱ्या दोन कंत्राटी लिपिकांची तीन तास चौकशी करून जबाब नोंदवले. विभागातील अन्य अधिकाऱ्यांनादेखील चौकशीसाठी बोलावण्यात येणार आहे. पथकाने हर्षकुमारच्या नावाने किती बँकांमध्ये खाती आहेत, याची माहिती मागवली आहे.

इंटेरिअरसाठी चीनहून वीस लाखांचे साहित्य

हर्षकुमारने विमानतळ परिसरातील एका इमारतीत एका शासकीय अधिकाऱ्याचा फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यासाठी त्याने दोन लाख रुपये ॲडव्हान्सही दिला. त्याच इमारतीत प्रेयसीच्या नावाने सहा खोल्यांचा दोन कोटी रुपयांना फ्लॅट खरेदी केला. त्याचे नुकतेच नूतनीकरण सुरू केले. आर्किटेक्टला त्याने पूर्ण फ्लॅट बदलण्याच्या सूचना केल्या होत्या. महागड्या उच्च दर्जाच्या फरशादेखील खरेदी केल्या. चीनहून सजावटीचे साहित्य मागवले. अंबड तालुक्यातील असलेला हर्षकुमार विंदडाच्या नावावर घेतलेली कार घेऊन पसार झाला आहे. त्याची प्रेयसीदेखील गायब आहे.