Colleges reopen in Maharashtra | तारीख ठरली ! या’ तारखेपासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू होणार!

जामखेड टाईम्स वृत्तसेवा । Colleges reopen in Maharashtra | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने बंद करण्यात आलेली महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हिरवा कंदील दिला आहे. पुढील महिन्यात राज्यातील सर्व महाविद्यालय सुरू होणार आहेत अशी माहिती उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

राज्यात महिनाभरापासून कोरोनाचा मोठा उद्रेक सुरू आहे.परंतू गेल्या काही दिवसांपासून रूग्ण कमी होऊ लागले आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला होता.तसेच राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले होते. नाईट कर्फ्यू राज्यात लागू आहे. तसेच दिवसा जमावबंदीचे आदेश कायम आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्यातील शाळा व महाविद्यालयीन शिक्षणावर मोठा परिणाम झालेला आहे. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट सक्रीय झाल्याने पुन्हा शाळा व महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाला मोठा विरोध सुरू झाला होता.

राज्यात कोरोनाची परिस्थिती अजूनही हवी तशी अटोक्यात नाही, परंतू रूग्ण संख्या काहीशी घटत चालली आहे. परंतू कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. असे असतानाही राज्यातील शाळा सरकारने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आता महाविद्यालये सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिली आहे.

येत्या 1 फेब्रुवारी पासून राज्यातील महाविद्यालये पुन्हा सुरू होणार आहेत अशी माहिती उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. यामुळे आता महाविद्यालये सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

दरम्यान, महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला असला तरी या निर्णयावरून सोशल मिडीयावर संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेक जण या निर्णयावर टीका करताना दिसत आहेत.